चित्रकला स्पर्धतील विजेत्यांना बक्षीसाचे वितरण
वाशिम – पोलीस रेझींग डे सप्ताहानिमित्त जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत भाग घेतलेल्या स्थानिक श्री बाकलीवाल विद्यालयाच्या एनसीसी (राष्ट्रीय छात्र सेना) विद्यार्थ्यांना १६ जानेवारी रोजी जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह व पीएसआय इथापे मॅडम यांच्या हस्ते बक्षीसे व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
पीएसआय इथापे, पोलीस अंमलदार बेबी राठोड यांच्या पुढाकारातुन घेण्यात आलेल्या या चित्रकला स्पर्धेत शहरातील सर्व शाळांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये बाकलीवाल शाळेच्या एनसीसी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून तीनही बक्षीसे पटकावली. बक्षीस वितरण कार्यक्रामत पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी विद्यार्थ्यांची संवाद साधुन त्यांचे कौतुक केले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक तृप्ती वानखेडे, द्वितीय वैष्णवी मापारी व तृतीय क्रमांक रोशनी खंडारे यांना मिळाला. यशस्वी विद्यार्थ्यांचे बाकलीवाल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. सुरेंद्रकुमार बाकलीवाल, शाळेचे मुख्याध्यापक बबनराव बिल्लारी, उपमुख्याध्यापक दंभीवाल, पर्यवेक्षिका सौ. भोंडे, एनसीसी अधिकारी अमोल काळे यांनी कौतूक केले.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206