चोरीचे 4 गुन्हे उघड, कासार शिरशी पोलीसांची दमदार कामगिरी..
लातूर : जिल्यातील निलंगा तालुक्यातील कासार शिर्शी पोलीस ठाणे हद्दीत 2023 च्या जानेवारी महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून अज्ञात चोरट्यांनी मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरल्याच्या घटना घडल्या होत्या.त्यावरून पोलीस ठाणे कासारशिरशी येथे मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरीचे एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आले होते.
सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी निर्देशित करून संबंधित पोलीस ठाण्याला महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे,उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग निलंगा डॉ.दिनेशकुमार कोल्हे यांचे मार्गदर्शनात कासारशिरशी चे स. पो. नि. रेवन्नाथ डमाळे यांचे नेतृत्वात पोलीस पथक नेमुन तपासा बाबत सूचना देण्यात आले होते.
तपासा दरम्यान सदर पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावरून मोठ्या शिताफीने आरोपी नामे 1) शैलेश श्रीमंत सूर्यवंशी, वय 23 वर्ष,व्यवसाय शिक्षण, राहणार विद्यानगर निलंगा.2) सुदाम तानाजी हजारे, वय 23 वर्ष, व्यवसाय शिक्षण, राहणार बिबराड, तालुका शिरूर आनंतपाळ, 3)भीम नागनाथ जाधव, वय 26 वर्ष , व्यवसाय जिम ट्रेनर ,राहणार शिवाजीनगर, निलंगा.आणि 4) ज्ञानेश्वर निवृत्ती शिंदे, वय 50 वर्ष, व्यवसाय भंगार विक्रेता, राहणार बोरसुरी तालुका निलंगा. यांना दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी ताब्यात घेऊन आरोपीकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी कासारशिरशी पोलीस स्टेशन हद्दीमधील मोबाईल टॉवरच्या कार्यालया मधुन मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरी केल्याचे कबूल केले.
पोलीस ठाणे कासारशिरशी येथे दाखल असलेल्या मोबाईल बॅटरी चोरीच्या चार गुन्ह्यातील मुद्देमाल,मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्याचा , गुन्ह्यात वापरलेले दोन वाहन व एक मोटर सायकल असा एकूण एकूण 11 लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून कासार शिरशी पोलीस ठाण्याला दाखल असलेल्या मोबाईल टॉवरचे बॅटरी चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत. नमूद आरोपींता कडून गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल मोबाईल टॉवरच्या 28 बॅटऱ्या जप्त करण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास कासार शिरशी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार हिंगमिरे हे करीत आहेत.
सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी निलंगा डॉ. दिनेशकुमार कोल्हे व कासारशिरशी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रेवन्नाथ डमाळे यांचे नेतृत्वातील टीम मधील पो. उप.नि. गजानन क्षिरसागर,स.फौजदार मारुती महानवर , नामदेव चामे ,पो.अं. बालाजी जाधव, राजू हिंगमिरे, गोरोबा घोरपडे, श्रीकांत वरवटे, महेश तोरंबे, शिवाजी लवटे, किशोर तपसे, वाजिद शेख, नवनाथ इंदापुरे, बाळू गायकवाड, बळी मस्के, अहमद मुल्ला, महिला पोलीस आमदार अंजना सुनापे यांनी मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरीच्या गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करून गुन्ह्याची उकल करून गुन्हे उघडकीस आणून, गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्याची कामगिरी बजावली आहे.
सचिन बिद्री