चोराला सोडून देतात संन्यासाला फाशी…कष्टाने कमावलेला पैसा जुगारात उधळला जातो…
जगण्याची भ्रांत हरविणारा आणि सर्वसामान्यांना देशोधडीला लावणारा वरली मटका, जुगार मलकापूर शहरात राजरोसपणे सुरू असून याकडे संबंधित अधिकारी अर्थपूर्ण दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. चोरट्या मार्गाने चालणारा हा वरली मटका जुगार आता शहरातील मुख्य रस्त्यांवर पाहायला मिळत आहे..
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात वरली मटका, जुगाराचा अवैध धंदा सुरू आहे दिवसागणिक या मार्गाच्या व्यवसायाची उलाढाल वाढत चालली आहे़ काही दिवसांपूर्वी शहरातील मोजक्याच ठिकाणी सुरू असलेला हा धंदा आता रस्त्या रस्त्यांवर आडोसा पाहून चालविला जात आहे़. मलकापूर शहर पोलीस स्टेशनला नव्याने लाभलेले पोलीस निरीक्षक यांनी आपला पदभार स्वीकारला असून त्यांच्याकडून मलकापूर वासियांना अवैध धंद्यांवर आता तरी आळा बसेल अशी अपेक्षा होती मात्र तसे दिसून येत नाहीये..
मलकापूर शहरांमध्ये खुलेआम हा अवैधरित्या वरली मटका जुगार सुरू असून याकडे पोलीस प्रशासन का दुर्लक्ष करीत आहे यावर प्रश्नचिन्ह देखील निर्माण होत आहे. अवैध धंदे बंद करण्याच्या मागण्या मागील काही दिवसांपासून जोर धरत असताना देखील पोलीस प्रशासन सूर्य प्रकाशासारखा” तेज दिसणाऱ्या त्या” वरली माफियांवर कारवाई करताना दिसून येत नाहीये
मलकापूर तालुक्यांतील शेतकरी व शेतमजुरांच्या आर्थिक अडचणीत मटका व जुगार भर घालत आहे. यामुळेच अनेक जण आत्महत्येकडे वळतात. नेमका काय प्रकार आहे याचा छडा लावण्यासाठी आम्ही मलकापूर् येथील काही ठिकाणी गेलो असता खुलेआम वरली मटका,जुगार सुरू होता.अनेक जण पैसे लावण्यासाठी गर्दी करून होते. कष्टाने कमावलेला पैसा या जुगारात उधळला जातो.त्यातून अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत असल्याचे नागरिक म्हणाले. मात्र याच वरली मटक्यावर पोलीस ही छापे मारतात पण चोराला सोडून संन्यासाला फाशी होते,पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या छोटे मासे गळाला तर लागता पण मोठे मासे काही गळाला लागतच नाही,की लावल्याचं जात नाही असाही प्रश्न जनसामान्यांमध्ये विचारला जात आहे. या वरली माफियाचा मलकापूर शहरातील सालीपुरा भागात अड्डा असल्याची चर्चा आहे..