बुलढाणाः गाव खेड्यामध्ये आजही अनेक उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरे केले जातात. त्यातच दोन वर्षाच्या करोनाच्या कालखंडानंतर आता मोठ्या उत्साहात परिसरात यात्रा महोत्सव साजरा केला जात आहे. अशीच बुलडाणा जिल्ह्यातील कोलारा यात्रा करता गेलेला युवक घरून तर निघाला पण पुन्हा परत आलाच नाही. शोध सुरू झाला पण शेवटी मिळाला तो मृतदेह. नेमकं काय झालं जाणून घेऊया.
२८ वर्षीय तरुण २६ जानेवारी रोजी मित्रांसोबत कोलारा येथील यात्रेला गेला होता .परंतु यात्रा झाली तरी घरी परत आलाच नाही. आई-वडिलांनी शोध घेतला असता कुठेही सापडला नाही. शेवटी आई-वडिलांनी गावकऱ्यांकडे मदत मागितलीत तेव्हा सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. त्याचवेळी गावालगत असलेल्या एका विहिरीत मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. ही घटना २८ जानेवारी रोजी दुपारी उघडकीस आली.