section and everything up until
* * @package Newsup */?> खुल्या बाजार भावाने सी.सी.आय.व्दारे मलकापूर येथे कापूस खरेदीचा शुभारंभ | Ntv News Marathi

बुलडाणा : मलकापूर आज दिनांक 20/12/2022 रोजी सकाळी 11.00 वा भारतीय कपास निगम प्रा.लि.(सी.सी.आय.) यांची कृषि उत्पन्न बाजार बाजार समिती मलकापूरचे कार्यक्षेत्रातील बाहेती जीनींग (आशुतोष ॲग्रो इंडस्ट्रीज) येथे सी.सी.आय.यांचे नियमा प्रमाणे खुल्या बाजार भावाप्रमाणे कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. उदघाटन प्रसंगी कापसाला प्रति क्वि.8100 रुपये भाव देण्यात आला. कापूस खरेदी व काटापुजन बाजार समितीचे समितीचे सचिव श्री.अजय जाधव यांचे हस्ते करण्यात येवून प्रथम शेतकरी विजय ज्ञानदेव बोरले धरणगांव यांचा शाल श्री फळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी, सी.सी.आय. केंद्र प्रभारी श्री दिपक पाटोळे, श्री.बोकले साहेब, कापूस खरेदीदार गोविंद सेठ बाहेती,आदित्य बाहेती, राजूसेठ चौधरी, बाजार समितीचे कर्मचारी श्री.सुभाष गुजर,श्री.प्रशांत तळोले, श्री.उमेश पाटील,श्री.भगवान जाधव,श्री.विलास बोंबटकार,श्री.पुरुषोत्तम धोरण,यांचे सह सतीश जगताप,सुभाष मोरे,बब्बू शहा तसेच इतर परिसरातील शेतकरी बंधू उपस्थित होते.
या प्रसंगी परिसरातील शेतकरी बंधूनी आपला कापूस शेतमाल सी.सी.आय.केंद्रावर विक्री करण्यास आणून सोबत आधार कार्ड व बँक पास बुक झेरॉक्स आणावी असे आवाहन बाजार समितीचे सचिव श्री अजय जाधव यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *