24 पैकी 17 जागेवर भाजपा विजयी तर काँग्रेस चा सफाया- भाजपचा दावा
मंगळवारी लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात मलकापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पार्टीला मोठा धक्का बसल्याचे पहावयास मिळाले या मतदारसंघातील एकूण 24 ग्रामपंचायतीचा निकाल काल घोषित करण्यात आला यामध्ये 17 जागांवर भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारली तर मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे आमदार असतांना काँग्रेस पार्टीला ग्रामीण भागातील जनतेने नाकारल्याचे दिसून आले तर भारतीय जनता पार्टीला 24 पैकी 17 जागांवर विजय मिळाला असल्याचा दावा भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार चैनसुख संचेती यांनी केला आहे.
गावासाठी मिनी मंत्रालय मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल काल मंगळवारी हाती आले आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाने आपला सर्वाधिक ग्रामपंचायत ताब्यात ठेवून झेंडा रोवला आहे. मात्र या मतदारसंघांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची सत्ता असून काँग्रेसचे आमदार या मतदारसंघात असल्याने देखील या ठिकाणी एवढ मोठ यश भारतीय जनता पार्टीला मिळाला आहे. मलकापूर विधानसभा मतदार संघात येणाऱ्या मलकापूर आणि नांदुरा तालुक्यातील एकूण 24 ग्रामपंचायतीपैकी 17 जागांवर भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारली असल्याचा दावा माजी आमदार चैनसुख संचेती यांनी केला आहे.