सामाजिक,आर्थिक लोकशाही व्यवस्था प्रस्थापित करणे ! हेच बाबासाहेबांना खरे अभिवादन !
बाबासाहेबांनी बुध्दाची समता,छ.शिवाजी महाराजांचा लोककल्याणकारी विचार,शाहू महाराजांचे आरक्षण संविधानात मांडले !
मलकापूर :- भिमनगर येथील प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास आज ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त माल्यार्पण करून सामुदायिकरित्या अभिवादन करण्यात आले.
यावेळी अशांतभाई वानखेडे यांनी प्रमुख मार्गदर्शन करतांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपले विचार व्यक्त केले.
जगाच्या पाठीवर अनेक देशातील नागरिकांना आपल्या मुलभुत अधिकारांसाठी संघर्ष करावा लागला मात्र भारतीय नागरिकांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संरक्षणाची हमी देणारे मुलभुत अधिकार संघर्षा शिवाय बहाल केले.देशवासियांसाठी ही एक मोठी उपलब्धी म्हणून मान्य करावी अशी बाब होय.
बुद्धाची समता,छ.शिवाजी महाराज यांची लोककल्याणकारी संकल्पना,छ.शाहू महाराज यांचा आरक्षणाचा विचार आदींचा भारतीय संविधानात समावेश करून राज्याची मार्गदर्शक तत्व,राज्य घटना दुरूस्तीचे प्रावधान ठेवत कार्यपालिका,न्यायपालिका,विधीमंडळाची अधिकारीता,न्यायालयाची सर्वोच्चता,राज्याचे व केंद्राचे अधिकार याबाबतीत सुनिश्चित मांडणी करून एक सार्वभौम आदर्श संविधान देशबांधवांना अर्पित केले ही देश वासियांसाठी गौरवास्पद बाब असल्याचे वानखेडे यांनी आपल्या भाषणात नमुद केले.
एक व्यक्ती,एक मत व एक मुल्य यामुळे स्त्री पुरूष समता,राजकीय समता प्रस्थापित झाली.आर्थिक व सामाजिक समतेकडे संविधानानुसार देशाची लोकशाही व्यवस्था अग्रेसर व्हावी.देशात सामाजिक व आर्थिक लोकशाही समृद्ध व्हावी यासाठी कर्तव्यभावनेने भारतीय नागरिकांनी प्रयत्न करावेत, बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करणे हेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना खरे अभिवादन ठरेल असे मत “समतेचे निळे वादळ” या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशांतभाई वानखेडे अभिवादनपर विचार व्यक्त करताना मांडले.
यावेळी सर्वश्री समाजभुषण आत्माराम इंगळे,भाऊसाहेब सरदार,दिलीपभाऊ इंगळे,मोहन खराटे,देविदास इंगळे,सतिश दांडगे,रोशन वाकोडे,भारत महाले,शकील जमदार,राजू खराटे,संदेश वानखेडे,दिपक रणित,जयराज वानखेडे,हरीभाऊ वाघोदे,पांडूरंग महाले,संकेत वानखेडे,आकाश महाले,अजय इंगळे,निखील सोनोने,अविनाश इंगळे,सुरेंद्र सरदार,गौतम सरदार,आनंद इंगळे,रोहित गायकवाड,गंगाराम वाघोदे,प्रफुल इंगळे,नवल वानखेडे,अंकुश तायडे,सौरव पैठणे,अजिंक्य झनके,संतोष अजने,निंबाजीअबगड आदी प्रामुख्याने उपस्थित होते.