बुलढाणा जिल्ह्यातील मढ या गावामधे दिनांक ४ डिसेंबर २०२२ रोजी आदिवासी समाजाचे जन नायक राॕबीनहुड म्हनुण ओळख असलेले शुर विर तंट्या भिल (मामा ) यांच्या शहीद बलीदान दिनी तंट्या मामा यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले
तंट्या भिल हे एक मोठ्ठे लढाऊ पराक्रमी शुर योद्धा विर जन नायक होते त्यामुळे इंग्रजांनी त्यांना राॕबीनहुड असे नाव पदवी दिली होती त्यांचा जन्म मध्यप्रदेश मधे आदिवासी जमाती मधे झाला होता तंट्या भिल यांच खर नाव टंड्रा भिल हे होतं मोठी क्रांती घडवुन आननारे क्रांतिकारक तंट्या उर्फ तात्या टंड्रा भिल होय ब्रिटिशांना सतत अकरा वर्ष हुलकावणी देनारे आणि सळोकी पळो करुन सोडनारे आणि आदिवासी व शेतक-यांना, सावकार, मालगुजार आणि जुलमी सरकार यांच्या विरुध्द पेटवुन उठण्यासाठी प्रेरणा देनारे तंट्या मामा आदिवासी शेतक-यांच्या क्रांतिचा पहीला नायक होय अशा प्रकारे खुप मोठा इतिहास या क्रांतिकारकाचा आहे तंट्या मामा यांच्या शहीद दिनानिमीत्त मढ या गावामधे त्यांना आदिवासी समाजातर्फे श्रध्दांजली वाहुन अभिवादन करण्यात आले याच दिनानिमीत्त महाराष्ट्र एकलव्य आदिवासी तडवी भिल्ल विकास परिषद या सामाजिक संघटना तर्फे सामाजिक जनजागृति कार्यक्रम घेण्यात आला या जनजागृति कार्यक्रमादरम्यान संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अफसर तडवी यांनी आदिवासी समाजाला तंट्या भिल ( मामा ) यांच्या बद्दल माहिती त्यांचा इतिहास सांगीतला आणि आदिवासी योजनांबद्दल ही मोलाची माहिती दिली या कार्यक्रमादरम्यान सुत्रसंचालन डाॕ. समिर तडवी म. प्रदेश सल्लागार यांनी केले या वेळेस संघटनेचे पदाधीकारी मराठवाडा संघटक इरफान तडवी जळकी कर, जालना जिल्हा अध्यक्ष इसराईल तडवी वाढोणा , बुलढाणा तालुका अध्यक्ष , महम्मद तडवी , सिल्लोड ता. अध्यक्ष सलाउद्दिन तडवी, औरंगाबाद जिल्हा संघटक समिर तडवी जळकीकर, सलिम तडवी , शफीक तडवी, रफीक तडवी, वसीम तडवी , राशदबाई , रुकसना तडवी, इरशादबाई, अलीशानबाई , चाॕंद तडवी,बनेखा बरडे , शामिरखा बरडे,शाहरुख बरडे,मरजीना बागुल,आयुष तडवी, हसन तडवी , सलिम बागुल आणि आदिवासी महिला, पुरुष लहान मुलं, मुली , ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते
प्रतिनिधी जब्बार तडवी