औरंगाबाद जिल्हा ग्रामीण पोलीस दलातील अनेक पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या बदल्यांचे आदेश ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी नुकतेच काढले असल्याने अजिंठा पोलीस ठाण्याचे स.पो.नि.अजित विसपुते यांची औरंगाबाद येथे बदली झाली असुन. त्यांना सुरक्षा शाखा येथे प्रभार देण्यात आला आहे . त्यांच्या जागी नियंत्रण कक्षातून प्रमोद भिंगारे यांची अजिंठा येथे बदली झाली आहे.
अंजिठा पोलीस ठाण्याला जवळपास ४५ ते ५० गावे असून या ठाण्याला ४५ किमी पेक्षा जास्त लांब व्यासाचा परिसर आहेत. या परिसरात आर्थिक उलाढालीचे गावे असल्यामुळे अवैध धंदे सुद्धा जोरात सुरू आहे . ते रोखण्यात पोलिसांचा नेहमीच कानाडोळा होता. अजिंठा ,शिवना , धोत्रा , गोळेगाव , पानवडोद ,उंडणगाव , आंभई परिसरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहे .आता नव्याने रुजू होणारे स.पो.नि प्रमोद रंगनाथ भिंगारे यांच्यासमोर हे अवैध घंदे रोखण्याचे आव्हान असणार आहे. अजिंठा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालणाऱ्या अवैध धंद्याला आत्ताच रुजू झालेली स.पो.नि प्रमोद भिंगारे लगाम घालतील अशी अपेक्षा सर्वसामान्यांची आहे.
….,…………………..
………………………
अजिंठा पोलीस ठाणे अंतर्गत व गावात जे कोणी लपून छपून अवैध धंदे करीत असेल यांची गय केली जाणार नाही जे लोक अवैध धंदे करीत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल मला व्हाट्सअप द्वारे गुप्त माहिती नागरिकांनी देण्यात यावे अशी माहिती
स पो नि प्रमोद भिंगारे
सिल्लोड प्रतिनिधी मुजीब शेख से