20 फेब्रुवारी 2023 च्या राज्य व्यापी बेमुदत संपात अंगणवाडी सेविका मदतनीसानी पूर्णतः सहभागी व्हावे -जिल्हा अध्यक्ष कॉ. राम बाहेती
सिल्लोड प्रतिनिधी : गेल्या कित्येक दिवसापासून महाराष्ट्र राज्यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधनात भरघोस स्वरूपाची वाढ करण्यात यावी या प्रमुख मागणी सह सदोष पोषण ट्रकर व इतर अन्य मागण्या सह धरणे आंदोलन सुरु आहेत. किंबहुना केंद्र सरकार ने साडेचार वर्षे उलटून गेली तरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात कोणत्याही स्वरूपाची वाढ़ केलेली नाही. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत राज्य सरकारनेही अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्याना केराची टोपली दाखवत कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत . डोहीजड होणारे भंगारात विकण्याच्या लायकीचे निकृष्ट दर्ज्याचे मोबाईल सेविकांना देऊन जबरदस्तीने दडपशाही करत इंग्रजी भाषित असलेले पोषण ट्रकर भरण्यास भाग पाडले आहे असा हा छळ एकंदरीत सुरु असून २०१७ पासूनचा प्रोत्साहन भत्ता देखील अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेला नाही किंबहुना मोबाईल ची वाढत्या दरानुसार रिचार्ज रक्कम देखील देण्यात येत नाही याचाच एक भाग म्हणून ३ जानेवारी २०२३ पासून मोबाईल वापसी तथा मासिक अहवालावर राज्यभरात बहिष्कार आंदोलन सुरु आहे हे सुरु असतानाच राज्य सरकारने घोषणा केली कीं २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाला सरकार गोड बातमी देणार असल्याचे चित्र सरकारने भासविले परंतु असे फक्त लबाडाचे जेवण राज्य सरकारने दिले व दरम्यानच्या सर्व मागण्या सकारात्मक मंजूर होण्याचे फक्त आश्वासन आणि फक्त आश्वासनच या सरकारने देऊ केले आहेत. याच पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविका मदतनीसामध्ये आता संतापाची लाट उसळली असून त्यांच्या शांततेचा भंग होऊन सरकारच्या या बेबनाव धोरणाविरोधात त्यांनी बंड पुकाराला असून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक तथा कृती समिती ने २० फेब्रुवारी २०२३ ला राज्य व्यापी बेमुदत संप करण्याचे योजिले आहे.
या संपात राज्यभरातील सर्व अंगणवाडी कर्मचारी सुमारे दोन लक्ष कार्यकर्ती मदतनीस सहभागी होणार होणार आहेत. दरम्यान या काळात अंगणवाडीचे सर्व कामकाज ठप्प असणार आहेत. मुलांना दिला जाणारा गरम व ताजा आहारपुरवठा देखील बंद असणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आज सोमवार दि.0६ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ठीक 0१:00 वा. सिल्लोड प्रकल्प अधिकारी यांना २० फेब्रुवारी २०२३ च्या बेमुदत संपाची नोटीस बजावयाची असल्यामुळे भव्य धडक मोर्च्या चे आयोजन करण्यात आले आहेत. तरी या मोर्च्यात बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयटकचे जिल्हा अध्यक्ष कॉ. राम बाहेती यांनी केली आहे.
यावेळी मोर्च्याचे नेतृत्व जिल्हा अध्यक्ष कॉ. राम बाहेती जिल्हा सचिव कॉ. तारा बनसोडे जिल्हा संघटक कॉ. अनिल जावळे कॉ माया भिवसने कॉ. संगीता अंभोरे काम्युनिस्ट पार्टीचे कॉ. सय्यद अनिस आदी करणार आहेत.
तथा सिल्लोड तालुक्यातील मोर्च्याचे आयोजन आयटक कौन्सिल सदस्य कॉ. संगीता अंभोरे यांनी केले आहे
मोर्च्या दुपारी ठीक १ वा. डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक सिल्लोड येथून मार्गस्थ होऊन सिल्लोड शहर बसस्थानक रोड ने भगत सिंग चौकातून छत्रपती शिवाजी महाराज कमाणीतून प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयावर धडकेल.व सदरील संपाचे निवेदन आयटकचे शिष्टमंडळ एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प -१ व प्रकल्प -२ ला देतील तथा पुढील काळात संप कर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येऊन मोर्चा समाप्त होईल.