लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथे तक्रारदार यांनी समक्ष येवून तक्रार नोंद केली की, तक्रारदार यांचे राशन चे २ दुकान असून तक्रारदारास राशन दुकानाकरिता शासनातर्फे पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत कायदेशीर कमीशन मिळते. ते कमिशन आलोसे श्री. विजय कृष्णराव सहारे पद जिल्हाधिकरी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी, जि. वर्धा यांनी काढल्याने त्याचे २५०००/- रूपये तसेच तक्रारदराचे २ राशन दुकानाचे ७ महिन्याचा हफ्ता २५,०००/- रूपये असे एकुण ५००००/- रूपये ची श्री. विजय कृष्णराव सहारे यांनी मागणी करून तडजोडी अंती ४०,०००/- रूपये स्विकारण्याची तयारी दर्शविली असता आरोपी क्र. श्री. ऋषिकेश रमेशराव ढोडरे (खाजगी इसम ) यांचे मार्फतीने आलोसे श्री. विजय कृष्णराव सहारे यांनी पहिला हप्ता २००००/- रूपये लाच रक्कम शासकीय विश्रामगृह, वर्धा येथे स्विकारतांना दोन्हींना रंगेहात पकडण्यात आले.
नमुद आलोसे यांनी आपले लोकसेवक पदाचा दुरूपयोग करून स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता
लाच रकमेची मागणी करून स्विकारल्याने त्यांचे विरूध्द पोलीस स्टेशन वर्धा शहर जि. वर्धा येथे भ्रष्टाचार
प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात येत असून उपरोक्त आलोसे यांना ताब्यात घेण्यात
आलेले आहे.
सदरची कारवाई श्री. राहुल माकणीकर, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर, श्री. मधुकर गिते, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक श्रीमती अनामिका मिर्झापुरे, पोलीस निरीक्षक प्रविण लाकडे, नापोशि सारंग बालपांडे, मनापोशि गिता चौधरी, करूणा सहारे, अस्मिता मेश्राम, आशु श्रीरामे, चानापोशि विकास गडेलवार सर्व नेमणुक ला. प्र. वि. नागपूर यांनी केलेली आहे.
प्रतिनिधी विनोद गोडबोले नागपूर