लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथे तक्रारदार यांनी समक्ष येवून तक्रार नोंद केली की, तक्रारदार यांची नगर पंचायत अंतर्गत शेतजमीन असून गड क्र. ९०२ मधील क्षेत्र ०.४० हे. आर. चौ. मी. जागेला रहिवासी प्रयोजनार्थ प्रस्तावित अभिन्यासास विकासात्मक परवानगी मिळवून देण्याकरिता तसेच शेतजमीन अकृषक करण्याची नगर पंचायत अंतर्गत संपूर्ण प्रक्रिया करून देण्याकरिता आलोस १ ) श्री. गजानन मनोहर कराड पद स्थापत्य अभियंता नगर पंचायत लाखणी अतिरिक्त प्रभार नगर पंचायत लाखांदुर जि. भंडारा व २) श्री. विजय राजेश्वर करंडेकर पद कनिष्ठ लिपीक यांनी तक्रारदार यांना १,१०,०००/- रूपये लाचेची मागणी करून कंत्राटी इसम आरोपी क्र. ३) मुखरन लक्ष्मण देसाई यांनी आलोसे क्र. २) श्री. विजय राजेश्वर करंडेकर पद कनिष्ठ लिपीक यांचेसांगणेवरून पंचासमक्ष १,००,०००/- रूपये स्विकारले.
नमुद दोन्ही आलोसे यांनी आपले लोकसेवक पदाचा दुरूपयोग करून स्वतःच्या आर्थिक
फायद्याकरिता लाच रकमेची मागणी करून खाजगी इसम आरोपी क्र. ३ चे मार्फतीने स्विकारल्याने त्यांचे
विरूध्द पोलीस स्टेशन लाखांदुर जि. भंडारा येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा नोंद
करण्यात येत असून उपरोक्त तीनही आरोपींतांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई श्री. राहुल माकणीकर, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर, श्री. मधुकर गिते, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक श्रीमती योगिता चाफले, पोलीस निरीक्षक वर्षा मते, पोलीस निरीक्षक आशिष चौधरी, पोना अमोल मेंघरे, अनिल बहिरे, मनापोशि अस्मिता मल्लेलवार, मपोशि/ हर्षलता भरडकर सर्व नेमणुक ला. प्र. वि. नागपूर यांनी केलेली आहे.
प्रतिनिधी विनोद गोडबोले नागपूर