नागपुरचा खाजगी रूगनालयात भर्ती होते
खापरखेड़ा चनकापुर या मार्गे कोलार नदी घाटावर अंतिम संस्कार केला जानार
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव यांचे वडील तिलक यादव (७४) यांचे २२ फेब्रुवारीला सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्यावर मागील अनेक महिन्यांपासून नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते दोन दिवसांपूर्वी खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी उमेश यादव यांच्याशी चर्चा केली मात्र त्यांची प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामूळे त्यांना मिलन चौक खापरखेडा येथील त्यांच्या घरी आणण्यात आले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू उमेश यादव यांचे वडील तिलक यादव हे वलनी कोळसा खाणीतील सेवानिवृत्त कर्मचारी होते.*त्याना पहेलवानीची (कुस्ती) आवड होती.

उत्तर प्रदेशातील पडरौना जिल्ह्यातील पोखरभिंडा गावातून नोकरीच्या शोधात तिलक यादव लहानपणी नागपुरात आले होते त्यांच्या पश्चयात आंतरराष्ट्रीय खेळाडू उमेश यादव, रमेश, कमलेश, आणि एक मुलगी आहेत तिलक यादव यांची सर्वच मुले विवाहित असून नातू नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे २३ फेब्रुवारी गुरुवारला सकाळी ९.३० वाजता चनकापूर मिलनचौक परिसरात कोलार नदी घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे
मंगेश उराडे नागपुर