नागपूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची चिचोली जि.प.सर्कल ची बैठक भाऊसाहेब बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भवन येथे पार पडली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले अमूल्य विचार घेऊन पक्षवाढीसाठी , आगामी निवडणुकासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा.निस्वार्थ भावनेचा समाजकार्यातून पक्ष वाढविण्यात सर्वात मोठी मदत होते. समाज हिता साठी काम करा येणारा काळ तुमचाच राहिल असे मनोगत भाऊसाहेब बोरकर यांनी व्यक्त केले.
या वेळी चिंचोली खापरखेडा सर्कल चे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे अध्यक्ष म्हणून ग्रा. प चिंचोली चे युवा सदस्य धीरज बोरकर यांची नियुक्ती करण्यात आली व लवकरात लवकर कार्यकारणी गठीत करण्याचे आदेश भाऊसाहेब यांनी नवनिर्वाचित अध्यक्षय यांना दिले .
यावेळी बैठकीत पृथ्वीराज बागडे,प्रकाश लांजेवार, मनोहर डोंगरे, विजय गजभिये, मोतीराम लांजेवार, राजेश देशभ्रतार, रामराव मेश्राम, रवी शेंडे, उमेदलाल राउत, किशोर रंगारी, प्रशांत पाटील, चक्रधर पाटिल, राजकिरन शेंडे, विलीन बागडे, प्रतिक उके, त्रिशरण कुऱ्हाडे, राहुल ठाकरे, अभिषेक शेंडे, सुरेश नागदवणे, राजरतन देशभ्रतार, मिलिंद ढोके, प्रितेश उके, आशिष सोमकूवर, सुमित इंगोले, आशिष धनविजय, ग्रा प.सदस्या सोनू ठाकरे, सोनाली बागडे, महीला मंडळ चा किरण शेंडे, करुणा बागडे , गंगाबाई लोखंडे, सविता नारनवरे,स्वाती फुलझेले, गीता पानतावणे, मैनाबाई सोमकुवर, यमुबाई लांजेवार, संजिविनी मेश्राम, बोरकर आई, आवर्जून उपस्थित होते..
प्रतिनिधी
विनोद गोडबोले
नागपूर खापरखेडा