थकीत वीजबिलापैकी किती रक्कम भरायची ?

पुणे : कोंढापुरी येथील शेतक-याचा शिक्रापूर येथील महावितरण कार्यकारी अभियंता,उप अभियंत्यांना मेलद्वारे अर्ज
थकीत वीजबील नील करण्याच्या दृष्टीने थकीत वीजबिलातील किती रक्कम भरायची ? असा सवाल शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील शेतक-याने शिक्रापूर येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता,उप अभियंता यांना विनंती अर्जाद्वारे केला आहे.
शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील शेतीपंपाची वीजबीले थकीत असल्याने महावितरण कर्मचा-याने तीन दिवस़ांपूर्वी शेतक-यांच्या शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित केला आहे.खंडीत केलेल्या शेतीपंपाच्या वीजपुरवठ्याच्या तसेच थकीत वीजबिलाच्या पार्श्वभूमीवर कोंढापुरी येथील शेतकरी विजय संभाजीराव ढमढेरे यांनी शिक्रापूर येथील महावितरण अधिका-यांना मेलद्वारे अर्ज केला आहे.महावितरण कार्यकारी अभियंता,उपअभियंता यांना मेलद्वारे पाठविलेल्या अर्जात कोंढापुरी येथील शेतकरी विजय ढमढेरे यांनी म्हटले आहे,

मी, विजय संभाजीराव ढमढेरे कोंढापुरी ता.शिरूर येथील रहिवासी असून माझी विद्यूतमोटार ( ग्राहक क्रमांक 184000004051) कोंढापुरी येथील पाझर तलावावर असून माझ्याकडे महावितरणची शेतीपंपाची ३५,७४०/- रूपये थकबाकी होती. त्यापैकी १०,७३०/- रूपये ५/१२/२०२२ रोजी भरले ( paid ) असून २५०१०/- रूपये थकबाकी आहे. थकबाकी भरलेली नसल्याने महावितरण कर्मचा-याने दोन दिवसांपूर्वी दि.९/०२/२०२३ रोजी शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला आहे.दरम्यान, ३१ मार्च २०२३ पर्यंत थकबाकी भरणा-या कृषीपंप ग्राहकांना थकबाकीवर ३० टक्के सुट देण्यात येत असल्याचे समजते. विलंब आकार व व्याज पूर्णत: माफ करण्यात येत असल्याचेही समजते. थकबाकी भरण्याची माझी तयारी असून थकबाकी ३५७४०/- रूपयांपैकी १०७३०/- रूपये ५/१२/२०२२ रोजी भरले असून महावितरणने जाहीर केलेल्या ३० टक्के सवलत धोरणानुसार थकबाकी पूर्णपणे Nil करण्याच्या दृष्टीने २५०१० /- रूपयांपैकी किती रूपये भरावे लागतील हे समजत नाही असे विनंती अर्जात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *