अहमदनगर : जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात पश्चिम भागातील खांडगाव,जोहारवाडी,मांडवे,राघुहिवरे परिसरात चोरट्यांनी अक्षरशःधुमाकुळ घातला आहे.चोरट्यांनी आपला मोर्चा शेतकऱ्यांकडे वळविला असुन या भागातील विहीरीवरील मोटारी,स्टार्टर तसेच सौर उर्जेच्या प्लेटा चोरीस जात आहेत.तालुक्यातील मांडवे गावात १०-१२ विहिरीवरील मोटारी चोरीस गेल्या आहेत यासंबंधी काही शेतकऱ्यांनी पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये तक्रारी दिल्या आहेत.जोहारवाडी येथील विविध कार्यकारी सोसायटीने चेअरमन मच्छिंद्र सावंत यांच्या शेतातील त्यांच्या पत्नी खांडगाव-जोहारवाडीच्या उपसरपंच कविता सावंत यांच्या नावे असलेल्या ४० हजार रुपये किंमतीच्या सौर उर्जेच्या प्लेटा गट नं.६२ मधुन चोरीस गेल्या असुन त्यांनी पाथर्डी पोलिस स्टेशनला याबाबत गुन्हा दाखल केला आहे.तसेच परिसरातील खांडगाव,जोहारवाडी,राघुहिवरे,मांडवा गावातुन यापुर्वी अनेक मोटारी,सौर उर्जेच्या प्लेटा चोरीस जाण्याचे प्रकार घडले आहेत.मात्र याबाबत शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली नाही.या परिसरात विहीरीवरील मोटारी व सौर उर्जेच्या प्लेटा चोरणारी टोळी कार्यरत असल्याने या भागातील शेतकऱ्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

करंजी परिसरातील जोहारवाडी,खांडगाव,मांडवेसह अनेक गावातील शेतकऱ्यांच्या मोटारी,सौर उर्जेच्या प्लेटा चोरणाऱ्या टोळीचा बंदोबस्त न झाल्यास या भागातील शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत असा इशारा जोहारवाडी विविध कार्यकारी सेवा ससोसायटीचे चेअरमन मच्छिंद्र सावंत यांनी दिला.

तसेच सध्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा चालु आहेत,पोलिस कर्मचारी बंदोबस्तात गुंतले आहेत,तरीही लवकरच रात्रीची गस्त वाढवुन शेतकऱ्यांच्या मोटारी व सौर उर्जाच्या प्लेटा चोरणाऱ्या चोरांना गजाआड करु अशी माहिती पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी दिली.

यावेळी मच्छिंद्र सावंत,लालासाहेब सावंत,बंडु सावंत,सुदाम सावंत,दादासाहेब सावंत,दामोदर सावंत,सिताराम सावंत,अण्णासाहेब वांढेकर,नानासाहेब वांढेकर,शशिकांत सावंत,संतोष चव्हाण,प्रकाश जगदाळे,पिनु ससे,महादेव चव्हाण यांच्यासह परिसरातील अनेक शेतकर्‍यांनी उपस्थित होते.

भिवसेन टेमकर,

पाथर्डी,अहमदनगर

मो. 9373489851

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *