अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागात कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा!-चोऱ्या,खुलेआम अवैद्य धंद्यामुळे गुन्हेगारीत वाढ-नागरिकात संताप!
पाथर्डी तालुक्यात दिवसा-ढवळ्या होणाऱ्या चोऱ्या,राजरोसपणे चालणारे अवैद्य धंदे,रात्री-अपरात्री उघडे असणारे धाबे यामुळे पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागातील गावात नागरिकात दहशतीचे व भितीने वातावरण निर्माण झाले असुन कायदा व सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत.पाथर्डी तालुक्यातील करंजीसह भोसे,खांडगाव,लोहसर,जोहारवाडी,राघुहिवरे,मोहोजसह अनेक गावात खुलेआम मटका,जुगार,अवैद्य दारु विक्री चालु असल्याने चोऱ्या,मारामाऱ्या,गुंडगिरी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने सर्वसामान्य नागरिकात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.काही दिवसापुर्वी निंबोडी फाट्यानजिक भर दिवसा सराफास अडवुन लुटले,परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरीवरील अनेक मोटारी चोरीस गेल्या एवढेच नव्हे तर सौर उर्जेच्या प्लेटाही चोरीस जात आहेत.नगर-पाथर्डी हायवेचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे पाच लाखाहून अधिक रकमेचे साहित्य चोरीस गेले,करंजीचे ग्रामदैवत असलेल्या उत्तरेश्वर मंदिरातील पिंडीवर तांब्याची कळशी भर दुपारी चोरट्यांनी चोरुन नेली.करंजी-मिरी आठवडा बाजारातुन मोटार सायकली तसेच महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरीस जाणे अशा किती तरी लहान-मोठ्या घटना या परिसरात घडलेल्या असताना कोणत्याही गुन्ह्याचा तपास पोलिसांना लागत नसल्याने सर्वसामान्य नागरिक अशा घटना घडुनही पोलिसात तक्रार देत नाहीत.करंजी औटपोस्टला कायमस्वरुपी पोलिस बंदोबस्त असावा अशी मागणी या भागातील नागरिकांनी अनेकवेळा करुनही त्याची दखल घेतली जात नसल्याबद्दल नागरिकातुन तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील गावे गुन्हेगारांची आश्रयस्थाने होत असुन या भागात कायद्याचा धाक राहिला नाही.या भागातील वाढत्या चोऱ्या,राजरोसपणे चालणारे अवैद्य धंद्यास येत्या आठ दिवसात आळा न घातल्यास या भागातील नागरिक तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा संभाजी ब्रिगेडचे तालुका उपाध्यक्ष सुभाष अकोलकर,जोहारवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन मच्छिंद्र सावंत,घाटसिरसचे माजी उपसरपंच नवनाथ पाठक,भोसे गावचे सरपंच विलास टेमकर,युवानेते अशोक टेमकर,हिम्मत पडोळे,पंढरीनाथ चोथे,अनिल पाठक,सतिष श्रेत्रे,लालासाहेब सावंत,संतोष चव्हाण,नानासाहेब वांढेकर,बंडु सावंत यांच्यासह परिसरातील अनेक ग्रामस्थांनी दिला आहे.उद्या सकाळी मी या भागात येऊन पहाणी करुन काही गावातील सर्वसामान्य नागरिकाशी चर्चा करणार आहे.या भागात रात्रीची गस्त व बंदोबस्तात वाढ करुन चोरांचा बंदोबस्त करु अशी माहीती पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी पत्रकारांना दिली.
भिवसेन टेमकर Ntv न्यूज मराठी पाथर्डी,अहमदनगर.मो.नं.9373489851.