अहमदनगर : शहरातील रामवाडी परिसरात हिंदुत्ववादी संघटनेचे कुणाल भंडारी हे त्यांच्या मित्रांसह दुचाकीवरून जात असताना त्यांच्यावर काल (सोमवारी) रात्री हनामारी झाली. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गुन्ह्यांचे सत्र थांबेना कुणाल भंडारी व त्यांच्या मित्रावर जमावाने हल्ला चढविला. यात भंडारी यांच्या पोटाला धारदार शस्त्राचा घाव लागला. मागील १५ दिवसांत शहरातील ही तिसरी प्राणघातक हल्ल्याची घटना आहे. प्रा. शिवाजी होले यांचे खुनी अजूनही सापडलेले नसताना भंडारींवर प्राणघातक हल्ला झाला आहे.