तीस हजार पडले महागात, तलाठी व कोतवाल अँटी करप्शनच्या जाळ्यात.
Breaking News
छत्रपती संभाजीनगर, :- कन्नड तालुक्यातील महसूल विभागातील पिशोर भारंबा येथील कार्यरत असणाऱ्या तलाठी दिपाली योगेश बागुल व कोतवाल हरून छोटू शेख यांना आज रोजी पंचा समक्ष तीस हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
तक्रारदार यांचे भारंबा शिवारातील वडीलोपर्जित जमीन असून तक्रारदार व ईतर दोघां भावांचे नावे फेरफार नोंद करण्यासाठी पंचासंमक्ष 30,000/- लाचेची मागणी करुन स्विकारले असतांना जागीच पकडण्यात आले.
यशस्वी सापळा कारवाई ही पोलीस निरीक्षक श्री एस.एस.शेख, यांनी केली.