छ.संभाजीनगर : देशभरात ४ मार्च पासून चालू असलेले राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह निमित्त वाळूज औधोगिक वसाहतील इप्का लॅबोरेटरीज लिमिटेड कंपनीने या वर्षाचे “शून्य अपघात” घोषवाक्य चे महत्व पटवून देत कारखान्यात जी कामे केली जातात त्या संबंधात सुरक्षेविषयी प्रात्यक्षिके दाखवून सुरक्षा विषयक कामकाजावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम, कर्मचाऱ्यांना रसायन आणि विद्युत सुरक्षितता जोखीम हाताळणे, अग्निशामक नियंत्रण, प्रथमोपचाराचे ज्ञान,आणि प्रशिक्षण व आपत्ती विषयक सखोल माहिती देऊन त्याचे व्यवस्थापन पर इत्यादीची कर्मचारीसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

“गुणवत्ता पेक्षा सुरक्षा महत्वाची” त्यामुळे कामगारांनी कोणतेही काम करतेवेळी घाईगडबडीने न करता काम करण्याअगोदर त्या कामात कुठला धोका आहे का? त्याचा अगोदर विचार करून ते काम करायला हवे किंवा आपले सहकर्मचारी चुकीचे काम करत असल्यास त्यास तात्काळ पायबंद करावे, आणि व्यवस्थापनाच्या नजरेस आणून द्यावे ज्यामुळे संभाव्य अपघात होण्याअगोदर टाळता येईल डॉ. व्यंकट मैलापूर यांनी कर्मचाऱ्यां मोलाचे मार्गदर्शन केले

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून औधोगिक सुरक्षा छ्र. संभाजीनगरचे सह संचालक श्री. राम दहिफळे हे उपस्थित होते, त्यावेळी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करतेवेळी त्यांनी सुरक्षरेचे व कर्मचाऱ्यांना अपघात कमी करण्यासाठी सुरक्षित ऑपरेटिंग पद्धतीचे काटेकोर पणे पालन केले तर भविष्यात होणारे धोके कमी होतील असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून संबोधले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अजिनाथ सुरवसे यांनी केले तर, त्यावेळी , रमेश बिरादार, महेंद्र चौधरी, परवेज खान , मधुकर गीते , एकनाथ पवार , प्रफुल्ल कांबळे , संतोष कोटकर, वसंत कपाटे, बबन काळे इत्यांदीची उपस्तीथी होती, तर कार्यक्रमाचा समारोप आकाश पुंड यांनी केले.

प्रतिनिधी:- अनिकेत घोडके
NTV न्युज मराठी, वाळुज छत्रपती संभाजीनगर.
मो.8484818400

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *