हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी पदभार स्वीकारल्यापासून हिंगोली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेदारांना कडक सुचना देत गुन्हेगारी कमी करने , प्रलंबित गुन्हे व तक्रार अर्ज प्रकरणाचा जलद गतीने निपटारा करने तसेच लपून छपून सुरू असलेले अवैध धंदे पुर्ण पणे बंद करून जनता व पोलीस सुसंवाद अधिकाधीक वाढवावा,
यासाठी दामिनी पथक,भरोसा सेल, पेट्रोलिंग,पोलीस दिदी,काका,कोबिग आॅपरेशन असे विविध उपक्रमांच्या माध्यमातून चोरी,तसेच गुन्हेगारी याला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी वेळोवेळी पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले होते. हिंगोली जिल्ह्यातील तेरा पोलीस ठाण्यापैकी तिन पोलीस ठाण्याची उत्कृष्ट कामगिरीबद्दल निवड करण्यात आली
असून यामध्ये प्रथम क्रमांक कुरुंदा पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन मोरे यांना प्रशस्तीपत्र, 1500 रु.बक्षीस देऊन गौरविण्यात आले,तर द्वितीय क्रमांक नर्सी नामदेव पोलीस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक अरुण नागरे यांना प्रशस्तीपत्र, 1200 रु.बक्षीस देऊन गौरविण्यात आले तर तृतीय क्रमांक गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवि हुंडेकर यांना प्रशस्तीपत्र 1000 रु बक्षीस देऊन गौरविण्यात आले आहे.
तिन ही पोलीस ठाण्याच्या कामगिरी बद्दल पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरव करत पोलीसांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल कौतुकाची थाप दिली आहे.
हिंगोली प्रतिनिधी फारुख शेख.