हिंगोली शहरातील आदर्श एज्युकेशन सोसायटीचे आदर्श महाविद्यालयातील विद्यार्थी ओमकार सुरेश बांगर याने युट्युब चे सिल्वर प्ले बटन प्राप्त केल्याबद्दल तसेच पुढील कार्यासाठी अमेरिकेला जाण्याची संधी मिळाल्याबद्दल आदर्श शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री रामचंद्रजी कयाल यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
ओमकार सुरेश बांगर हा विद्यार्थी आदर्श कनिष्ठ महाविद्यालय हिंगोली येथे वर्ग १२ वी वाणिज्य शाखेत शिक्षण घेत असून युट्युब ची आवड म्हणून सहा महिन्यापूर्वी ‘कॉमर्स गेमर्स’ या नावाचे यूट्यूब चैनल सुरू केले होते. बघता बघता अगदी चार ते पाच महिन्यात एक लाख फॉलोवर सदरील युट्युब चॅनलला प्राप्त झाले. एक लाख पेक्षा जास्त फॉलोवर प्राप्त झाल्यामुळे युट्युब कडून युट्युब चे सिल्वर प्ले बटन प्राप्त झाले आहे. तसेच या विद्यार्थ्याला पुढील कार्यासाठी विदेशात अमेरिकेला युट्युब कडून बोलवण्यात आलेले आहे. सध्या ‘कॉमर्स गेमर्स’ या युट्युब चॅनलवर पाच लाख पेक्षा अधिक फॉलोवर असून या चॅनलवर माईंड क्राफ्ट या गेमचे व्हिडिओ तयार करून अपलोड करण्यात आले आहेत.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. विलास आघाव, अधिक्षक श्री दिलीप दुबे, स्टाफ सचिव डॉ. अण्णाजी मडावी, प्रा. निलेश उबाळे, प्रा. सुरेश वरहाड. प्रा. सपना पुपूलवाड, प्रा. रचना पारीख, श्री सुरेश बांगर ईत्यादीची उपस्थित होती
