सेनगाव येथे दिनांक 29 मार्च 2008 रोजी तालुका न्यायालय स्थापन झाले तेव्हापासून सेनगाव न्यायालय हे किरायाच्या जागेत भाडे तत्वावर सुरू करण्यात आले होते. तेव्हापासून आजपर्यंत पंधरा वर्षे कालावधीमध्ये सेनगाव न्यायालय इमारतीचे जागे करता प्रतीक्षेत आहे परंतु न्यायालयाला न्याय मिळत नाही सेनगाव न्यायालयाचे अंतर्गत 130 गावे येतात दररोज अनेक पक्षकार न्यायाच्या प्रतीक्षेत न्यायालयात येतात परंतु न्यायालयांमध्ये अपुरी जागा शौचालय नाही पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही महिला करता स्वतंत्र बसण्याची व्यवस्था नाही स्वतंत्र तांत्रिक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे प्रकरणाचा लवकरात लवकर निपटारा होत नाही.प्रकरणाची वाढती संख्या यामुळे न्यायालयाकरिता स्वतंत्र इमारत जागा असणे अत्यंत आवश्यक आहे परंतु शासनाच्या उदासीनतेमुळे न्यायालयाच्या इमारती करीता जागा निश्चित करून अधिग्रहित करण्यात आली नाही त्याकरता सेनगाव तालुका न्यायालयाकरिता जागा इमारत अधिग्रहित करण्याकरता सेनगाव वकील संघ सदस्य यांनी अनेक वेळा माननीय जिल्हा न्यायाधीश परभणी येथे भेटून संपर्क करून न्यायालयाच्या जागे करता त्वरित पुढील कारवाई करावी याकरता विनंती केली आहे. परंतु मागील पंधरा वर्षापासून शासनाच्या वतीने न्यायालय करता शासकीय अथवा खाजगी जमीन जागा अधिग्रहित करण्याकरता उशीर करीत आहेत. त्यामुळे सेनगाव तालुका दिवाणी व फौजदारी न्यायालय सेनगाव यांच्या इमारती करता जमीन जागा अधिग्रहित त्वरित करणे करता सेनगाव वकील संघ सदस्य यांच्या सर्वानुमते 4 मार्च 2023 पासून सेनगाव न्यायालयात कामकाज न करण्याचे कामबंद आंदोलन करण्यात आले आहे. लवकरात लवकर जमीन अधिग्रहित करण्यात आली नाही तर सदरचे काम बंद आंदोलन अधिक तीव्र करण्याचे संकेत वकील संघाचे सदस्य व वकील संघाचे अध्यक्ष यांनी दिले आहेत.
प्रतिनिधी
महादेव हरण
सेनगाव हिंगोली