section and everything up until
* * @package Newsup */?> मोफत प्रवास मात्र बस खटारा प्रवाशांचे हालच हाल | Ntv News Marathi

औरंगाबाद

शासन जनसामान्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवतं मात्र प्रत्यक्षांत अंमलबजावणीत त्या योजनेचे तीनतेरा वाजलेले असतात याचाच प्रत्यय राज्य परीवहन महामंडळाच्या बसेसची अवस्था पाहुन येत आहे. आगारात बस दुरुस्ती साठी लागणारे साहित्य (पार्ट) उपलब्ध राहत नसल्याने अनेक वेळा वृध्द व युवकांना बस ला दे धक्का सुद्धा करावे लागते, राज्यशासनाने ७५ वर्ष वयाच्या वरील जेष्ठ नागरीकांना बसचा प्रवास मोफत केला आहे,पण ग्रामिण भागात मोडक्या तोडक्या बस देऊन जेष्ठ नागरीकांच्या जीवाला धोका निर्माण केला असल्याची स्थिती आहे.
राज्य शासनाने नुकतीच ७५ वर्ष वयापेक्षा जास्त असलेल्या नागरीकांना बससाठी मोफत प्रवास अशी घोषणा केली.त्यानुसार जेष्ठ नागरीकांना बसने विनातिकिट महाराष्ट्रात कुठेही प्रवास करता येने सोईचे आहे.यामुळे आता बसमध्ये वृध्द लोकांची गर्दी दिवसागणिक वाढत आहे.वृद्ध लोकांना मिळणार्‍या या सुविधेमुळे काही घरातील लोक वेगवेगळ्या कामांसाठी वृद्धांना बाहेर पाठवत असल्याचेही दिसत असल्याने बसमध्ये वृद्धांची मोठी गर्दी दिसत आहे.
पण ग्रामिण भागात मात्र खिळखिळ्या झालेल्या बस देऊन महामंडळ या वृद्धांच्या जीवाशी खेळच खेळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.ग्रामिण भागात फिरणार्‍या वयोमर्यादा संपलेल्या अनेक बस या दुरुस्तीला आलेल्या असुन काचा तुचलेल्या,सीट तुटलेले,पत्रा बाहेर निघालेला,दरवाजा व्यवस्थित नसणे अशा प्रकारच्या बस रस्त्याने धावतांना दिसतात.त्यामुळे बसमध्ये प्रवास करणार्‍या वृध्दांच्या जीवाला धोका निर्माण होण्याचे प्रकार घडण्याची शक्यता आहे.या खटारा सीटवर वयवृध्द सोडा पण धडधाकट प्रवाशांनाही हाडे मोडण्याची भीती दिसत आहे.त्यामुळे महामंडळाने मोफत प्रवास दिला पण खटारा बसमुळे वृध्दांचा हात पाय मोडल्यास मात्र दवाखान्यात आपलेच पैसे जातील या गोष्टी लक्षात ठेवुनच घरातील लोकांनी वृध्द लोकांना कीती प्रवास करु द्यायचा याचा विचार करायला हवा अशी स्थिती आहे.
ग्रामिण भागात बसने विद्यार्थी,वृध्द,अपंग,रुग्ण,महीला बहुसंख्येने प्रवास करतात.पण खटारा बसमुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आलेली आहे.
मोफत प्रवासामुळे वृध्दांचा जीवघेणा अनावश्यक प्रवास…!
प्रवास मोफत असल्याने अनेक वृध्द शरीर साथ देत नसतानाही अनावश्यक प्रवास करताना दिसत आहेत
मात्र बसमध्ये गर्दीत चढताना होणारी रेटारेटी,बसची आतुन दयनीय अवस्था पाहील्यावर जर काही अनुचित प्रकार घडल्यास त्या लोकांना दुरुस्त करण्यासाठी तिकीटापेक्षाही कीतीतरी अधिक रुपये खर्च करावी लागतील याचा विचार व्हायला हवा.

NTV न्युज मराठी रिपोर्टर जब्बार तडवी सोयगाव औरंगाबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *