section and everything up until
* * @package Newsup */?> अवैध दारु ची विक्री करना-या तीन आरोपींना पोलिसांनी पकडुन केली मोठी कारवाई | Ntv News Marathi

औरंगाबाद

पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवर,  सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी उपविभाग वैजापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक  संजय लोकरे यांच्या पथकाने दिनांक १४ / ३ / २०२३ रोजी  अवैध दारू पकडुन मोठी कारवाई केली आहे.

सकाळी ०६.०५ वाजता पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली की, इसम नामे १) रवी मारोती फुलारे, २) सुभाष साहेबराव फुलारे, ३) संतोष राजपूत हे दोन मोटार सायकलवर पुरणगाव रोडने शेतकरी हॉटेल जवळून अवैधरित्या दारूची चोरटी वाहतूक करणार आहेत. अशी माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी सापळा रचला व शेतकरी हॉटेल जवळ रोडवर ०६.३० वाजता मोटास सायकल एक्स पौशन प्रो MH १७ BA ७०२२ ही प्रथम पकडली ती रवी मारोती फुलारे रा. वडारवाडा वैजापूर हा चालवत होता त्यापाठीमागेच दुसरी शाइन मोटारसायकल क्रमांक MH २०-३४३६ ही येत असताना त्याला पोलीस पकडतील याची चाहूल लागली आणि ते तेथून पळून गेले. पकडलेल्या इसमास पळून जाणाऱ्या इसमांचे नाव गाव विचारले असता ते त्याचेच साथीदार असून त्यांची नावे २) सुभाष साहेबराव फुलारे रा.बडारवाडा, वैजापूर, ३)संतोष राजपूत रा. एन एम सी कॉलोनी, वैजापूर असे सांगितले. सदर वाहनास कॅरेट लटकवलेले होते. त्यामध्ये खालील प्रमाणे मुद्देमाल मिळून आला.
१) २६८८०/- रूपये खाक्या कागदी बॉक्स त्यावर भिंगरी सत्रा असे कागदी लेवल असलेल्या १८० एम. एल चा देशी दारू भिंगरी संत्राचे ७ बॉक्स प्रत्येकी बॉक्स किंमत ३८४०/- रु दराप्रमाणे किं. अं.
०२) ६७२०/- विदेशी दारू आयबी कंपनीच्या १८० मिली ची काचेचा एकूण ४८ सीलबंद बाटल्या प्रत्येक बाटली रु. १४०/- प्रति किमत.
०३) ३०,०००/- मो.सा.क्रमांक MH.१७ BA ७०२२ x passion Pro कंपनीचे की. अंदाजे.
4)८०००/- एक विवो कंपनीचा मोबाईल सिम नंबर ७६५८७०२२००
७१,६००/- असा एकूण रूपये*
किमतीचा मुद्देमाल पकडण्यात आलं आहे.
पोलीस अंमलदार वाल्मीक बनगे वय २९ वर्षे व्यवसाय नोकरी पोको १७७० नेमणूक पोलीस ठाणे वैजापूर यांच्या फिर्याद वरून पोलीस स्टेशन वैजापूर येथे कलम ६५(ई), ८3 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राम कवडे हे करत आहेत.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक श्री. संजय लोहकरे, पो.उप.नि/ राजपुत, पो.उप.नि शेख, स.फौ/महादेव निकाळजे, घागरे, पोलीस अंमलदार वाल्मीक बनगे, विजय भोटकर, पवण सुंदर्डे, प्रशांत गिते, प्रल्हाद जटाळे होमगार्ड – चव्हाण, इंगळे, पठाण, मापरी यांनी केली आहे.

NTV न्युज मराठी रिपोर्टर जब्बार तडवी औरंगाबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *