वाशिम :- रिसोड तालुक्यातील पार्डीतिखे येथे शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दि. १ एप्रिल २०२३ रोजी सांयकाळी ७ वाजता केले आहे. यावेळी प्रा. महेश देवळे आणी प्रसिद्ध गायिका जयश्री भंडागे यांचा समाजप्रबोधन व शिव शाहू फुले आंबेडकर गीताच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मनोरंजनातून प्रबोधन आणी प्रबोधनातुन परीवर्तन करत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले,छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचाराला अनुसरुन स्वप्नातील समाज घडविण्यासाठी प्रबोधन व भिमगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच ज्या धम्म उपासक उपासिका यांनी. हिवरापेन येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाला सहकार्य केले.

त्यांचा सत्कार पार्डीतिखे येथील कार्यक्रमात करण्यात येनार आहे. असे माधव सुधाकर अंभोरे यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे केले आहे. सदर कार्यक्रम वेळेवरच होणार असून पार्डीतिखे, बेलखेडा, हिवरापेन, चिंचाबापेन, पेडगाव, वरुडतोफा, आसेगावपेन, वरूडतोफा, बोराळा, कोठा, ढोरखेडा, खंडाळा येथील धम्उपासक उपासिका यांनी सदर कार्यक्रमा पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करून बहुसंख्येने उपस्थीत राहावे. असे आवाहन पार्डीतिखे येथील गावकऱ्यांनी केले आहे.
प्रतिनिधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206