बाभूळगाव पत्रकार संघटनेचे तहसिलदारांना निवेदन

बाभूळगाव : समाजाचा आरसा संबोधणाऱ्या माध्यमाला लोकशाहीचा चौथास्तंभ मानल्या जातो . मात्र या माध्यमात काम करणाऱ्या प्रतिनीधी व कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते . माध्यमाच्या माध्यमातून सेवा देणारे वृत्तपत्रप्रतिनीधी व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनीधी , या क्षेत्रात काम करणाऱ्या माध्यम कर्मीचे प्रश्न शासनाने सोडवावे व योग्य ते उपाय योजना करण्यात याव्या या मागणीचे निवेदन व्हॉईस ऑफ मिडीया या संघटनेच्या पदाधिकारी यांनी तहसिलदार मिरा पागोरे यांना आज गुरूवारी ( ता . ८ ) रोजी निवेदन दिले . पत्रकारांसाठी स्वतंत्र्य कल्याणकारी महामंडळ स्थापन करून भरीव निधी देण्यात यावा . पत्रकारीतेत पाच वर्ष पुर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिसिकृती पत्रिका देण्यात यावी , वृत्तपत्रांना सद्या जाहीरातीवर लागू असलेला जि.एस.टी. कर रद्द करावा , पत्रकारांच्या घरासाठी विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा , कोरोनात जिव गवलेल्या पत्रकारांना फ्रंट लाईन वर्करचा दर्जा देवून मृत पत्रकारांच्या कुटूंबीयांचे पुनर्वसन करावे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले . संघटनेचे अध्यक्ष प्रफुल परडखे , शब्बीर खान , अंकुश सोयाम , सरफराज पठान , चंद्रशेखर परचाके , करामत अली , विलास चांदेकर , शहेबाज खान यावेळी उपस्थित होते .

प्रतिनिधी सरफराज पठाण
Ntv न्यूज मराठी बाभुळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *