महिलांसाठीचे मोफत व्यावसायीक शिलाई मशीन प्रशिक्षण कोर्स चे उद्घाटन
सचिन बिद्री उमरगा : महिला सर्वच क्षेत्रात अग्रेसर असून त्यांना उद्योग व्यवसायातून आर्थिक बळ मिळाल्यास त्यांचा नक्की सर्वांगिण विकास होईल, महिला युवती प्रशिक्षित,आत्मनिर्भर ,स्वावलंबी झाल्या तरच देश प्रगत होईल असे मत भाऊसाहेब बिराजदार अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन प्रा सुरेश बिराजदार यांनी व्यक्त केले. बलसुर येथे भाऊसाहेब बिराजदार सिनियर कॉलेज बलसुर व अपरल मेड अप्स अँड होम फरणीशिंग सेक्टर स्किल कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने युवती व महिलांसाठी मोफत शिवणकला प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन शनिवारी दि.२७ रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री बिराजदार बोलत होते.

यावेळी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया चे सिनियर मॅनेजर नीरज वाजपेयी,पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड,
जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश प्रवक्त्या रेखाताई सुर्यवंशी, समाज विकास संस्थेचे सचिव भुमीपुत्र वाघ,सरपंच जयश्री नांगरे , भारत शिक्षण संस्थेचे संचालक रमेश बिराजदार,प्राचार्य श्रीपाद कुलकर्णी, प्रशिक्षण प्रोजेक्ट मॅनेजर निकिता चौहान आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना श्री बिराजदार म्हणाले की , ग्रामीण भागातील महिला व युवतींनी विविध कौशल्यात वृद्धी करुन आत्मनिर्भर बनून घरप्रपंचाच्या सोबतच व्यवसायातून स्वावलंबी होत इतरांनाही काम देवुन स्वतःसह इतरांचे आधार व्हावे यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या सर्वांगीण विकासासोबत महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी एक छोटासा उपक्रम म्हणून शिलाई मशीन प्रशिक्षणातून ग्रामीण भागात महिला-युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यास सुरुवात करत आहोत. शिवणकला प्रशिक्षणाद्वारे मुलींना व महिलांना टेलरिंगमध्ये प्रशिक्षित करून रोजगार मिळवून देणे, यामध्येे गरीब, गरजू, निरक्षर महिलांना शिवणकला प्रशिक्षण देऊन आर्थिक उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरु आहे. सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.

यावेळी रेखाताई सुर्यवंशी, भूमिपुत्र वाघ यांनीही मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक विश्र्वरंजन मिश्रा तर शुभम स्वामी यांनी आभार व्यक्त केले.सूत्रसंचालन अमोल पाटील, पी बी सुर्यवंशी यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खाजा मजावर ,ग्रामपंचायत सदस्य ,पवन पाटील, महादेव नांगरे,गणेश वाडीकर, यांच्या सोबत श्री छत्रपती शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी धीरज बेळंबकर,वसंत साखरे,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रदीप पाटील,तंटामुक्ती उपाध्यक्ष सत्यनारायण जाधव, उपसरपंच सुरेश वाकडे, वाघांबर सरवदे, सुधीर नांगरे ,विशाल पाटील ,दत्तात्रय चव्हाण ,बालाजी हाडोळे यांच्यासह प्रशिक्षणार्थी महिला व परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.