प्रतिनिधी( नळदुर्ग )
उस्मानाबाद : जिल्ह्यातील NTV न्यूज मराठी व दैनिकाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक,राजकीय आणि क्रीडा क्षेत्रात जनजागृतीपर उल्लेखनीय कार्य केल्याने अहमदनगर येथील आनंत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.त्यानिमित्ताने उस्मानाबाद जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पत्रकार आयुब शेख यांच्या कार्याचे कौतुक करून भव्य सत्कार करण्यात केला.यावेळी अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सई भोरे पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे आणि रोटरी क्लब चे प्रविण स्वामीं यांची प्रमुख उपस्थिती होती तर शिवसेना नेते कमलाकर चव्हाण,ज्येष्ठ पत्रकार विलास येडगे,लतीफ शेख यांच्यासह परिसरातील पोलीस पाटील व प्रतिष्टीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.