- युवासेना सचिव सागर देशमुख यांचे नेतृत्व, खा. गवळींवर ओढला आसुड
- पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- ठीकठिकाणी बैठकांचे सत्र
वाशिम : यवतमाळ लोकसभा मतदारसंघांमध्ये संघटनात्मक बांधणीच्या दृष्टिकोनातून युवा सेना पश्चिम विदर्भाचे सचिव सागर देशमुख यांच्या नेतृत्वात युवासेना राज्य विस्तारक कामेश जाधव यांच्या अध्यक्षते खाली व युवासेना जिल्हा प्रमुख जुबेर मोहनावाले यांच्या प्रमुख उपस्थित वाशीम जिल्ह्यात महा परिवर्तन अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाला कारंजा अनसिंग व आडोली जिल्हा परिषद सर्कल येथून आज प्रारंभ करण्यात आला. कारंजा तालुक्यातील युवसैनिकांच्या पक्ष प्रवेश व कारंजा, मानोरा, मंगरुळपीर येथील नियुक्त्या करण्यात आली आहे यावेळी कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला असून अभियानादरम्यान देशमुख यांनी खासदार भावना गवळी यांच्यावर जोरदार आसूड ओढला.
यवतमाळ-वाशिम या लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा निष्ठावंत शिवसैनिक आगामी लोकसभा निवडणुकीत निवडून येईल, असा मानस युवासेना पश्चिम विदर्भाचे सचिव सागर देशमुख यांनी व्यक्त करत या मतदारसंघाची जोरदार संघटनात्मक बांधणी सुरू केली आहे. शिवसेना-युवासेना यासह अन्य आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी प्रवास सुरू केला आहे. याच क्रमात गद्दारांना धडा शिकवण्यासाठी व या मतदारसंघात अभूतपूर्व परिवर्तन घडवून येण्यासाठी पश्चिम विदर्भाचे सचिव सागर देशमुख यांनी महा परिवर्तन अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत ते यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील संपूर्ण कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच मतदार यांच्याशी थेट संवाद साधणार आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला जाणार आहे. या अभियानाचा आज कारंजा,अनसिंग, आडोली जिल्हा परिषद सर्कल येथून प्रारंभ करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे युवासेना विस्तारक कामेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व युवासेना जिल्हा प्रमुख जुबेर मोहनावाले यांच्या प्रमुख उपस्थित या अभियानाची बैठक पार पडली. या बैठकीला वाशिम जिल्हा प्रमुख जुबेर मोहनावाले,नितीन मडके,युवासेना कारंजा तालुका प्रमुख अविनाश दहातोंडे, युवासेना शहर वाशिम शाम पावडे,स्वप्नील उपाध्येय, शुभम वानखडे, किरण तुपाडे, निलेश तेकडे, विशाल गुंजाटे, राज तुपोने, सुनील कुर्वे, शिवा अंधारे मानोरा तालुका प्रमुख,तालुकाप्रमुख मनोज चौधरी, संतोष खंदारे, आशीष इंगोले, नाना देशमुख, राम सावके, सोशल मिडिया उपजिल्हाप्रमुख चेतन खोटे, अनसिंग शहरप्रमुख चंदन धोंगडे, उपशहरप्रमुख प्रेम ठाकरे, केतन खोटे, आडोली सरपंच प्रमोद इढोले, दत्ता इढोले, युवासेना उपतालुका प्रमुख रामहरी सावके, मनोज चौधरी, आशिष इंगोले, नाना देशमुख, संतोष काळे, भगवान वाकुडकर संतोष इढोले, प्रकाश इढोले, गणेश मोकळे यांच्यासह अन्य पदाधिकारी व शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.
गद्दारांना त्यांची जागा दाखवा : देशमुख
हिंदुरुदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे नेत असल्याचा खोटा आव आणणाऱ्या गद्दारांना आता धडा शिकवण्याची वेळ आली असल्याची जोरदार टीका खासदार भावना गवळी यांच्यावर युवा सेनेचे पश्चिम विदर्भाचे सचिव सागर देशमुख यांनी केली आहे. सत्तेचं पालुपद मिरवण्यासाठी व आपल्या भ्रष्टाचाराचे कुरण उघड होऊ नये, ईडीच्या भीतीने शिंदे गटात जाणाऱ्या व भाजपच्या दावणीला बांधल्या गेलेल्या खासदार भावना गवळींना पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसल्याचा हल्लाबोल सुद्धा देशमुख यांनी केला. अशा लाचार व्यक्तीला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नसल्याचेही ते म्हणाले.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206