नागपूर : खापरखेडा येथील प्रजापिता ब्रह्याकुमारी ईश्वरीय विद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पर्यावरणाचे महत्त्व सांगताना ब्रह्याकुमारी संगीता दीदी म्हणाल्या की, निसर्गाचे रक्षण करणे हे आपले परम कर्तव्य आहे. पर्यावरण दिन साजरा करणे म्हणजे केवळ झाडे लावणे नव्हे. पण त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. पर्यावरण शुद्ध ठेवण्यासाठी पर्यावरणात सकारात्मक भावना पसरवायला हव्यात, निसर्ग हा दाता आहे. जी आपल्याला नेहमीच काही ना काही देत आली आहे. निसर्गाला ते देणं हेही आपलं कर्तव्य आहे, त्याप्रती आपली चांगली भावना दाखवायची आहे. जितकी हिरवाई आपण करू तितका आनंद आपल्या आयुष्यात येईल. आज मानवामध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे पर्यावरणातील प्रदूषणही वाढत आहे. हे रोखण्यासाठी अंतर्गत विकास करावा लागेल, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये. आपला परिसर स्वच्छ ठेवा. सोबतच दीप प्रज्वलन करून संकल्पही करण्यात आला.
या कार्यक्रमात उपस्थित च्या. विश्वजित सिंग, डॉ.ओंकार केळवदे ग्रामपंचायत सदस्या रंजिता कांबले सौ . वंदनाताई बेले, , सुरक्षा कर्मचारी अरुणजी जोवल, हरिश चौधरी, आनंद श्रीवास्तव, शिवशंकर जांगडे, सरोज बत्रा, पूनम मारे आदी डॉ. व ब्रह्माकुमारी बंधू भगिनींनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला.
प्रतिनिधी विनोद गोडबोले खापरखेडा