section and everything up until
* * @package Newsup */?> शांतता समितीचे बैठकीत विविध मुद्यांवर चर्चाबैठकीत गाजला ठाणेदारांच्या बदलीचा मुद्दा | Ntv News Marathi

खापरखेडा, बकरी ईद व आषाढी एकादशीनिमित्त खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत शांतता कमिटीची बैठक ग्रामिण पोलीस अधिक्षक विशाल आनंद यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दया यशवंत लॉन येथे पार पडली. यावेळी ठाणेदार प्रविण मुंडेच्या बदलीचा मुद्दा गाजला शांतता कमिटीच्या बैठकीत ग्रामिण पोलीस अधिक्षकांनी विविध मुद्यांवर चर्चा करून मार्गदर्शन केले.

बैठकीला रामटेक विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अशित कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक काँग्रेटवार, लक्ष्मी मलकुवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते. खापरखेडा परिसरात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण मुंडे यांच्या बदलीचा मुद्दा चांगलाच चर्चेत असून त्याकरीता हेतुपुरस्सर कट रचल्याचा आरोप अनेक गावातील सरपंच व सामाजिक संघटनांनी केला आहे. यासंदर्भात खासदा एवकार संगठनेते मंडे यांच्या

बदलीचा मुद्दा उपस्थित करून कायदा-सुव्यवस्थेच्य दृष्टिकोनातून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण मुंड यांना परत खापरखेडा पोलीस ठाण्यात रुजू करावे, अशी मागणी पोलीस अधिक्षक विशाल आनंद यांच्याकडे केली. बैठकीत मटण, चिकन विक्रेते अतिक्रमण, शाळा-महाविद्यालय परिसरात स्पिड ब्रेकर, अवैध दारू विक्री, अंमली पदार्थ, अवैध वाहतूक, गौवंश तस्करी, लव जिहाद धर्मांतरण सोशल मीडियाचा गैरवापर आदी अनेक विषयांव सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी सर्व धर्मातील नागरिकांनी एकत्र येत धार्मिक सण साजरे करण्याचे आवाहन ग्रामिण पोलीस अधिक्षक विशाल आनंद यांनी केले, शिवाय कुणावरही शंका-कुशंका आल्यास पोलिसांना सूचन करण्याचे सांगितले. बैठकीला खापरखेडा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील जालंदर, सरचिटणीस कपिल वानखेडे, कार्याध्यक्ष केशव पानतावणे, दिवाकर घेर, अमर जैन, राजेश खंडारे, गिरधारी शर्मा, सुरेश वानखेडे, विनोद गोडबोले, वैभव काकडे, जि.प.सदस्य प्रकाश खापरे, उपसभापती राहुल तिवारी, सरपंच मिनाक्षी तागडे, चंद्रशेखर लांडे, उपसरपंच विश्वजित सिंग, ग्रा.पं. सदस्य धिरज‍ देशभ्रतार, मेहमूदभाई, भाजप ओबीसी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष विलास महल्ले, किशोर रंगारी, शंकर गोडसे, चंद्रशेखर पानतावणे, आशिष फुटाणे, रामू बसुले प्रशांत सरोदे, राजू रामटेके यांच्यासह अनेक गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य,पोलीस पाटील आदी उपस्थित होते
प्रतिनिधी विनोद गोडबोले खापरखेडा नागपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *