बैलजोडी मरण पावली असुन नुकसान भरपाईची मागनी शासनाकडे
औषधि दिल्याने २ बैल मृत्यु पावले
शेतकर्याला जगावे की मरावे असा प्रश्न पडला
सावनेर तालुक्यतील मौजा हत्तीसरा, येथील अल्पभुधारक शेतकरी लंकेश्वर गजानन येवले यांचा शेतीच्या कामासाठी बैलजोडी घेतली होती यापैकी १ (एक) बैल दिनांक २९/०७/२०२३ ला अचानक अंदाजे दुपारी १.०० वाजता मरण पावला, तसेच दुसरा बैल दिनांक ३०/०७/२०२३ अंदाजे सकाळी ५.०० वाजता मरण पावला. पंधरा दिवसां पुर्वी पशु दवाखाना श्रेणी-२ केळवद येथुन बैलांसाठी ZANFEN या नावावे जंतावे औषध आणले व डॉ. संदिप ढवळे यांनी सांगीतल्याप्रमाणे १०० मिली. एका बैलाला व १०० मिली. दुसऱ्या बैलाला पाजली पाजलनंतर लगेच बैलाला हगवण सुरु झाली
व त्यानंतर अचानकपणे दोन्ही बैल मरण पावले. त्यानंतर सदर तक्रार लंकेश्वर येवले यानी पशु चिकीत्सालय सावनेर येथे केली व तेथील डॉक्टरांनी दोन्ही बैल शवविच्छेदनासाठी नेले व शवविच्छे दनाचा अहवाल दिला. येवले शेतकरी यांचि आर्थिक परिस्थीती अत्यंत हलाखीची असुन अंदाजे किंमत रु. एक लाख रुपये होते. तितक्याच रुपयाचे नुकसान झाले आहे. आता शेतीच्या कामाकरिता बैलजोडी नाही कसे जगावे आणी काय करावे कळत नाही. करिता मला नवीन बैलजोडी घेण्याकरिता त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मांगनी लंकेश्वर गजानन येवले शेतकरी यानि शासनाला केली
मंगेश उराडे नागपुर