वाशिम :- पो.स्टे.वाशिम शहर हद्दीत घडलेल्या अप.क्र.372/23, पॉक्सोसह इतर कलामांन्वये दाखल असलेला अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी हरिष राठी यास वाशिम पोलीसांनी कन्याकुमारी येथून ताब्यात घेतले आहे.

 सदरचा फरार आरोपी हा सतत वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरत होता व त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक सतत त्याच्या मागावर होते. तो सध्या कन्याकुमारी येथे असल्याच्या माहितीवरून त्यास आज रोजी पो.स्टे.वाशिम शहरच्या पथकाने (सपोनि.खंदारे व पथक) यांनी ताब्यात घेतले असून त्यास वाशिम येथे आणण्यासाठी कायदेशिर कारवाई सुरू आहे. 

प्रतिनिधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *