मंगरूळपीर येथे शिवसेना ठाकरे गटाची आढावा सभा संपन्न


वाशिम:-आगामी यवतमाळ – वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तसेच शिवसेना नेते खा. संजय राऊत यांचा जूलै महिन्यात वाशीम येथे आयोजित दौऱ्या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मंगरूळपीर तालुका प्रमुख रामदास पाटील सुर्वे यांच्या नेतृत्वात शासकीय विश्रामगृह मंगरूळपीर येथे महत्वाची सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विवीध विषयावर चर्चा करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून जोमाने काम करायचे आहे. तसेच आगामी लोकसभा व विधानसभा मतदारसंघात जास्तीत जास्त उमेदवार कसे विजयी होतील यादृष्टीने एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी पक्ष संघटन हि काळाची गरज असून गावोगावी, नगरा नगरात शिवसेनेची शाखा उघडून संघटन बळकट करावं तसेच शिवसैनिकांना काही अडचणी असतील, दबाव तंत्राचा वापर होत असेल तर, त्यांनी घाबरून जाऊ नये त्यांच्या सोबत आम्ही सर्व खांद्याला खांदा लावून सोबत आहोत. असे याप्रसंगी बोलताना माजी राज्य मंत्री संजय देशमुख यांनी सांगितले.

याप्रसंगी सुधीर कव्हर शिवसेना ठाकरे गट जिल्हा प्रमुख वाशिम सुरेश मापारी मा. जिल्हा प्रमुख तथा अर्थ व बांधकाम सभापती वाशिम, अनिल राठोड शिवसेना नेते, प्रमुख शिंदे शिवसेना ठाकरे गट जिल्हा प्रमुख यवतमाळ, कॅप्टन सुर्वे शिवसेना नेते, राजेश पाटील राऊत मा. जिल्हा प्रमुख, निलेश पेंढारकर, राजाभय्या पवार, जुबेर मोहनावले युवा सेना जिल्हा प्रमुख वाशिम, प्रियाताई महाजन शिवसेना युवती जिल्हा प्रमुख, विवेक नाकाडे विधानसभा संपर्क प्रमुख, सचिन परळीकर शहर प्रमुख मंगरुळपिर, अर्जुन सुर्वे, युवा सेना विधानसभा संपर्क प्रमुख, सचिन डोफेकर, विलासराव लांबाडे, बंडू वैद्य, बबनराव सावके, डॉ. सुनिल राऊत, धीरज राऊत, ज्ञानूसिंग भडांगे, सतीश पाटील राऊत, संतोष लांबाडे, हितेश वाडेकर, यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. या बैठकीत शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय श्री उद्धव जी ठाकरे साहेब, महाराष्ट्र राज्य चे शिवसेना युवा नेते श्री आदित्य ठाकरे साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे एकनिष्ठ राहू असे आश्वासन सर्व शिवसैनिकांनी दिले.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *