वाशिम:-पो.स्टे.वाशिम शहर येथे अप.क्र.५६८/२३, कलम ४०६, ४२० भादंवि अन्वये दाखल गुन्ह्यातील हकीकत प्रमाणे वाशिम येथील अडत धान्य व्यापाऱ्याने त्याचेकडील ३२२ पोते सोयाबीन शेतमाल हा बार्शी, जि.सोलापूर पोहोचविण्यासाठी अशोक ले लँड कंपनीचा ट्रक क्र.MH 44 U 3577 चे चालक मालक रघुनाथ ज्ञानोबा खाटिक, वय ४४ वर्षे, रा.वडगाव दादाहरी, ता.परळी, जि.बीड याला दिली होती.
परंतु सदर व्यक्तीने सदरचा सोयाबीनचा शेतमाल ठरलेल्या ठिकाणी न पोहोचविता परस्पर विक्री करून आरोपी फरार झाला होता. त्यामुळे सदर आरोपीविरुद्ध पो.स्टे.वाशिम शहर येथे गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्या प्रकरणाचा तपास करत असतांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पो.स्टे.वाशिम शहरच्या तपास पथकाने सदर आरोपी नामे रघुनाथ ज्ञानोबा खाटिक, वय ४४ वर्षे, रा.वडगाव दादाहरी, ता.परळी, जि.बीड यास ताब्यात घेऊन त्याचेकडून सदर गुन्ह्यातील १६.५ टन सोयाबीन अंदाजे रक्कम ०८.६६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास व कायदेशीर कारवाई सुरु आहे.
सदर कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे, श्री.सुनीलकुमार पुजारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाशिम, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री.अमर मोहिते, पोनि.गजानन धंदर, पोउपनि.सचिन गोखले, पोहवा.महेश पाटेकर, लालमनी श्रीवास्तव, रामकृष्ण नागरे, पोकॉ.उमेश चव्हाण, राहुल चव्हाण यांनी पार पाडली.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *