उपविभागीय अधिकारी यांचे आवाहन
मंगरुळपीर: तहसिल कार्यालय,मंगरुळपीरअंतर्गत येणाऱ्या कार्यक्षेत्राकरीता उपविभागीय अधिकारी मंगरुळपीर यांच्या अध्यक्षतेखाली कोतवाल पदभरती-२०२३ ची प्रक्रिया सुरु आहे. कोतवाल पदभरती- २०२३ करीता भरती प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यात येत आहे. या पदभरती संदर्भात कोणत्याही अपप्रचाराला बळी पडून कोणीही कोणत्याही प्रकारची आर्थिक देवाण घेवाण करु नये. तसेच अपप्रचार करणाऱ्या व्यक्तीना समर्थन करु नये. मंगरुळपीर उपविभागातील कोतवाल पदभरती- २०२३ची प्रक्रिया पारदर्शकरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन उपविभागीय अधिकारी, मंगरुळपीर यांनी केले आहे.