(उमरगा प्रतिनिधी)
उमरगा तालुका संभाजी ब्रिगेड तर्फे उमरगा पोलिस ठाण्यात मनोहर भिडे यांच्यावर देशद्रोह्याचा गुन्हा दाखल करन्याची दि 27 जुन रोजी निवेदणाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
उमरगा पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,शिवप्रतिष्ठाण,हिंदुस्थान या
संघटनेचे प्रमुख मनोहर भिडे यांनी “येत्या 15 ऑगस्ट ला व 26 जानेवारीला तिरंगा झेंडा फडकावयाचा नाही.” अश्या प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आपल्या देशांला जुलमी सत्तांपासुन स्वातंत्र करण्यासाठी ज्या स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिले. ज्यांनी आपला व आपल्या परिवारांचा विचार न करता देश प्रथम म्हणुन देशांसाठी देशांच्या स्वातंत्र्यासाठी अहोरात्र कष्ट, हाल, अपेष्ठा सहन केल्या परिणामी देशांसाठी बलिदान दिले. अश्या शुरविर क्रांतिकाऱ्याच्या शौर्याला सलामी देण्यासाठी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. ज्यांच्या बलिदानामुळे आपण स्वतंत्रपणे राहु शकतो. स्वातंत्र पणे बोलु शकतो.
असा स्वातंत्र दिन आपण साजरा करू नये म्हणजे हा आपल्या देशाप्रती गद्दारी केल्यासारखे आहे.असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मनोहर भिडे सारख्या वादग्रस्त वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करू इच्छिणाऱ्यावर तात्काळ देशद्रोह्याचा गुन्हा दाखल करावा.अन्यथा संभाजी
ब्रिगेड तर्फे तीव्र असे आंदोलन छेडण्यात येईल असेही यामध्ये म्हटले आहे.
या निवेदनावर तालुकाध्यक्ष अण्णसाहेब पवार,तालुका उपाध्यक्ष अजित भोसले, वसंत माने, प्रदिप पाटील,शहर कार्याध्यक्ष लक्ष्मण शिंदे, शहर अध्यक्ष मंगेश भोसले,दत्ता अष्टे, अभि भोसले,सुशांत बिराजदार, कोषाध्यक्ष अनिल वाकळे आणि विकास जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.