कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील श्री श्री श्री दोडेंद्र स्वामीं हे विश्वकर्मा हिंदू धर्माच्या प्रचारार्थ महाराष्ट्रातील मराठवाडा दौरा दरम्यान उमरगा शहरातील विश्वकर्मा समाजबांधवाना दि 1 जुलै रोजी भेट दिली आणि वैदिक पुरातन हिंदू धर्म विचारावर बैठक आयोजित करून छोटेखाणी प्रचारसभा घेतली.यावेळी ते बोलत होते.
धर्माबाबत जनजागृतीपर समाजबांधवाना प्रबोधन करताना ते म्हणाले की पृथ्वीची निर्मिती होण्यापूर्वी पासून विश्वकर्माहिंदू धर्म पुरातन काळापासून अस्तित्वात असल्याबाबत ते बोलत होते. समाज संघटित राहून आपल्या धर्माचा प्रचार व प्रसार करा असे यावेळी समाज बांधवाना संबोधित केले. यावेळी जिल्हाध्यक्ष चेतन पांचाळ,तालुकाध्यक्ष धनराज पांचाळ,तालुका उपाध्यक्ष मारुती पांचाळ,सहसचिव भरत पांचाळ, ज्ञानेश्वर पांचाळ, लक्ष्मण पांचाळ, चंद्रकांत पांचाळ, चंद्रकांत कुमार, विजयकुमार पांचाळ, सुभाष पांचाळ, गोटू पंचाळ, महेश पांचाळ, खंडू पांचाळ, दत्ता पांचाळ, अंबादास पांचाळ, बालाजी आष्टे,देविदास पांचाळ, गोविंद पांचाळ, वैभव पांचाळ,संदीप पांचाळ, कृष्णा पांचाळ,राजु पांचाळ आदी समाज बांधव उपस्थित होते.

गुलबर्गा जिल्ह्यातील चिंचोळी तालुक्यातील सुलेपेठ येथे एकदंडगी नामक भव्य स्वरुपात मठ असून प्रतीवर्षाप्रमाणे यंदा श्रावण महिन्यात दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार असून मोठ्या संख्येने भाविक यावे असे विनंती पूर्वक निमंत्रण दिले. तसेच मठाच्या आवारात असलेल्या गोशाळेला आपल्या परीने मदत करावें असेही यावेळी सांगितले.धर्मप्रचारार्थ निघालेल्या मठाधीश श्री श्री श्री दोडेंद्र स्वामीं यांच्यासह त्यांचे सहकारी वैजनाथ पांचाळ आणि मोहन पांचाळ उपस्थित होते.
सचिन बिद्री:उमरगा