सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळवण येथील विशाल नरवाडे आज सुरगाणा तालुक्यात शासकीय योजनाची अंमलबजावणी आढावा घेण्यासाठी पाहणी दौऱ्यावर असताना तेथील कृषी विभागाशी संबंधित योजनांसाठी आढावा घेत घेतला. यावेळी त्यांनी काठीपाडा गावातील शेतकरी शेतात भात लावणी करत असताना दिसले. तालुक्यात भातशेती हे प्रमुख पीक आहे.
यावेळी भात शेती लावण्याची सर्व प्रक्रिया विशाल नरवाडे यांनी समजून घेतली. शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांना जाणवले की शेतकऱ्यांच्या मेहनतीपेक्षा भात शेतीतून शेतकऱ्याला उत्पन्न व आर्थिक मोबदला कमी मिळतो. त्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाचा व नवीन पद्धतीचा अवलंब करून भात शेती आधुनिक पद्धतीने करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे,अशी भावना व्यक्त केली.
यावेळी विशाल नरवाडे यांनी स्वतः भात लावणीचा अनुभव घेतला. स्वतःभात लावण्यासाठी गुडघाभर चिखलात,पाठीवर घोंगडी घेऊन हातात भाताचे रोप व या चिखलात भात लावणीचा अनुभव लक्षात राहण्यासारखा आहे. भर पावसाच्या या वातावरणात शेतकरी नेहमीच भात शेती करत असतो.याचा अनुभव भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी स्वतः शेतकऱ्याच्या शेतात जाऊन शेतीच्या कामाचा आनंद अनुभव घेतो हा एक सुखद धक्काच आहे, असे शेतकरी बांधवांनी भावना बोलून दाखवल्यात.
विशाल नरवाडे यांनी आपल्या पदाचा कार्यभार घेतल्यापासून सातत्याने लोकाभिमुख निर्णय घेतलेत. सातत्याने सामाजिक बांधिलकी व आपलेपणा जपून सर्वसामान्य जनतेच्या अडचणी समजून घेण्यासाठी ते नेहमीच सकारात्मक असतात.
प्रतिनिधी:-अनिल पवार कळवण नाशिक