उस्मानाबाद,दि.27(जिमाका): जिल्ह्यात 29 जुलै रोजी मोहरम आणि 1 ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती हे सण / उत्सव साजरे होणार आहेत.
मुंबई दारुबंदी कायद्यान्वये या कालावधीत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या देशी, विदेशी, एफएल-2, सीएलएफएलटिओडी-3, बीआर-2, ताडी आदी परवाना दुकाने 29 जुलै व 1 ऑगस्ट 2023 रोजी बंद ठेवण्याचे तसेच त्यावरील मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी दिला आहे.
प्रतिनिधी आयुब शेख