महागाव, दि.२९ (प्रतिनिधी) मागील काही दिवसापासून हिंगोली लोकसभा मतदार संघात सततधार पाऊस सुरु आहे. या पावसाने अनेक ठिकाणीचे जनजीवन विस्कळीत झाले. अनेकांचे घरे पाण्याखाली गेली. यामुळे नागरीकांचे संसारपोयोगी साहित्य, जिवनावश्यक वस्तू पाण्यात वाहुन गेल्या. त्यांना घरात चुल पेटविण्यासाठी देखील जागा शिल्लक राहिलेली नाही. महागाव तालुक्यातील लेवा येथील अनेक कुटुंबिय उघड्यावर आली आहेत. या कुटुंबियांची खासदार हेमंत पाटील यांनी भेट घेऊन बेघर झालेल्यांना शासनाची मदत येण्यापूर्वीच स्वतः पैसे खर्च करुन आधार देत तात्काळ जेवणाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
महागाव तालुक्यातील लेवा येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करुन आर्थिक मदत देण्याच्या संबंधित विभागाचे अधिकारी यांना सुचना दिल्या. ज्यांची घरे पाण्याखाली गेली आहेत. जनावरे दगावली. शेतातील पिके पाण्यात वाहुन गेली अशा सर्व शेतकरी आणि गावातील एकही नागरीक शासनाच्या मदतीपासून वंचित राहुनये, नागरीकांच्या नुकसानिचा त्यांना योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे असे देखील संबंधित तहसिलदार, कृषी अधिकारी यांना सांगितले आहे.
वेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख चितांगराव कदम ,उपजिल्हा प्रमुख डॉ.बी.एन.चव्हाण,तालुका प्रमुख राजू राठोड, सरपंच संघटना अद्यक्ष अमोल चिकने, तालुका प्रमुख संतोष जाधव, शहर प्रमुख अतुल मैड, युवासेना जिल्हा प्रमुख अविनाश कदम,शिवसेना तालुका संघटक कपिल पाटील,माजी नगरसेवक संदीप ठाकरे,रवी रुडे,युवासेना तालुका प्रमुख राम तंबाखे,उपतालुका प्रमुख पवन राठोड,SDM काळबांडे,तहसीलदार संजीवनी मुपडे,कृषी अधिकारी चव्हाण मॅडम, ठाणेदार वानखेडे,दत्तराव कदम,लेवा येथील सरपंच,ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी उपस्थित होते.