रफिक सरकार आर्णी

आर्णी ते धणोडा राष्ट्रीय चौपदरी महामार्गावरील कोसदनी घाटात विचित्र अपघात घडून 1पोलीस कर्मचारी संजय नेटके व आयशर वाहनाचा ड्रायव्हर पांडुरंग हरी नकाते जागीच ठार झाले तर 2पोलीस कर्मचारी कुणाल साळवे ,संतोष हराळ गंभीर जख्मी झाल्याची दुर्घटना रात्री अकरा वाजता चे सुमारास घडली. जखमींना यवतमाळ ला हलविले आहे.
कोसदनी हाइवे पुलिस, कोसदनी घाटात ट्रक चे पेपर तपास करत अस्ताना मागून येणाऱ्या आयचर गाडी नि पुलिस गाडी ला जोरदार भिड़न्त दिली. त्यामुळे पुलिस गाडी समोर असलेला ट्रक आनी मागुण आलेल्या आयचर मधे पोलीस वाहनाचा अक्षरश चुराडा होऊंन पुलिस गाडी मधे बसलेले 1पुलिस कर्मचारी व आयशर वाहनाचा ड्रायव्हर जागेवरच ठार झाले. आर्णी रोड वर पेपर तपास करणारे 2पुलिस कर्मचारी गंभीर जख्मी झाल्यामुळे त्याना यवतमाळ येथे पाठविन्यात आले आहे.
महामार्ग पोलिस यंत्रणेचे पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके नागपूर यांना मध्यरात्री घटनेची माहिती मिळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता प्रवास करून घटनास्थळ गाठले व आर्णीत तळ ठोकून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *