यवतमाळ : राष्ट्रवादीचे माजी आमदार ख्वाजा बेग यांनी उपमुख्यंत्री अजित दादा पवार यांची भेट घेऊन, यवतमाळ जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या समस्येकडे त्यांचे लक्ष वेधले. यावेळी ख्वाजा बेग यांनी उपमुख्यंत्री अजित पवार यांनी यवतमाळ जिल्हातील पुरग्रस्तांना विशेष मदत पॅकेज द्यावे अशी मागणी केली. दरम्यान लेखी निवेदनातून त्यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या व्यथेची सविस्तर माहिती देऊन,उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.
विशेष करून आर्णी साठी सुध्दा त्यांनी विकास कामांकरिता निधीची मागणी केली आहे. यामुळे भविष्यात नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी जाणार नाही व आर्णी करांचे नुकसान होणार नाही यासाठी ख्वाजा बेग यांनी विकास कामांसाठी निधी देण्यात यावा अशी मागणी निवेदनातून केली आहे.
जिल्ह्यातील एकूण ५२ मंडळात अभूतपूर्व तर इतर सर्व तालुक्यात मुसळधार पाऊस बरसला आहे.अरुणावती, पैनगंगा, अडाण, वाघाडी नदीच्या पुराने कित्येक गावांचा संपर्क तुटून मोठ्या प्रमाणात शेतीचे व असंख्य घराचे पडझड होऊन अतोनात नुकसान झाले.अशा गंभीर परिस्थितीत ज्या शेतकन्यांची पिके उध्वस्त झाली व ज्यांची शेत जमीन खरडून गेली त्या शेतकऱ्यांना आणि ज्यांच्या घरांची पडझड होऊन संसार उध्वस्त झाले अशा सर्व बाधित नागरिकांना भरघोस मदत तात्काळ होईल असे निकषापलीकडे जाऊन विशेष मदत पॅकेज देणेबाबत निर्णय घ्यावा आणि तसे आदेश प्रशासनास देण्यात यावे,अशी विनंती ख्वाजा बेग यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
रफिक सरकार आर्णी
यवतमाळ
9921342100