उमरखेड : प्रदूषित हवा आणि बदलते हवामान पाहता भारतासह संपूर्ण जगामध्ये ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढला आहे, अशी परिस्थिती लक्षात घेऊन सामाजिक व धार्मिक संस्था दावते इस्लामी इंडियाने आपल्या सामाजिक विभाग GNRF गरीब नवाज रिलीफ फाऊंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी वृक्षारोपण मोहीम राबवते, ज्याच्या माध्यमातून संपूर्ण भारतात लाखो झाडे लावण्यात आली आहेत यावर्षी ही मोहीम १ जुलैपासून संपूर्ण भारतात सुरू झाली आहे, या मोहिमेअंतर्गत आज उमरखेड येथे नगर परिषद डॉ इकबाल उर्दू प्रथामिक शाळा येथील उमरखेड पुलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ
, संतोष राठोड,
यांच्या हस्ते वृक्षारोपण करून मोहीमची सुरुवात करण्यात आली आहे या वृक्षारोपण मोहिमेत पाचशे वृक्ष लावण्याचा संस्थाचे मानस आहे या कार्यक्रमात माजी नगरसेवक सय्यद अफसर,मुख्याध्यापक सय्यद यूनुस, पत्रकार ताहीर मिर्ज़ा,सय्यद सरफराज, खालीद खान यांच्यासह अनेक मान्यवरनीं सामील होऊन वृक्षरोपण केले
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी दावते इस्लामीचे अमजत अत्तारी,नजीब अत्तारी, अज़ीम अत्तारी,रेहान अत्तारी,इमरान अत्तारी,नइम रजा,कारी वकार, तजम्मुल अत्तारी, अब्दुल माजीद अत्तारी, फारूक अत्तारी यांनी परिश्रम घेतले
