(बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत प्रथमच गुटख्या वर मोठी कारवाही )
*उमरखेड;( शहर प्रतिनिधी,) संपूर्ण महाराष्ट्रभर
गुटखा बंदी असतानाही बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत खुले आम गावो गाव चौका चौकात प्रतिबंधित गुटख्याची विक्री होत होती बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गुटखा कुठून येतो याची माहिती सामांन्य नागरिकाला माहित होती परंतु बिटरगाव पोलीस स्टेशन ला याचा काही पत्ता नसल्याचे बिटरगाव पोलिसांकडून भासविल्या जात होते व याच खुलेआम विक्री करण्यात येणाऱ्या गुटखा तस्करी व विक्रीतून
बिटरगाव पोलीस स्टेशन ला महिन्याकाठी मोठी आर्थिक रसद मिळत असल्याचा आरोप नागरिकांतून केल्या जात होता अशातच बिटरगाव पोलीस स्टेशनला नव्यानेच रुजू झालेल्या पोलीस निरीक्षक सुजाता बनसोड यांनी पदभार घेताच बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावागावात सुरू असलेले अवैध दारू विक्री जुगार मटका यांनी आपले बस्तान गुंडाळले पण गुटखा तस्करी चालू होती त्याला रोखण्याचे काम सुजाता बनसोड यांच्या समोर जणू एक आव्हान होते परंतु आवघड दिसणारी गुटखा तस्करावरील कार्यवाही ठाणेदार सुजाता बनसोड यांनी आपल्या कर्तव्याची चुणूक दाखवीत आज सकाळी 4 वाजता गुप्त माहिती दाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पूर्ण करून हिमायतनगर येथील गुटखा तस्कर शेख आमीर हे आपल्या सोबत्या कडून ढाणकी व परिसरात गुटखा विक्रीस घेऊन येत असल्याची माहिती मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणेदार सुजाता बनसोड व पोलीस कर्मचारी यांनी ब्राम्हणगाव सोईट रोडवर सोईट गावाजवळ ऑटोवर धाड मारून तपासणी केली आसता प्रतिबंधात्मक गुटखा आढळून आला ऑटो चालक विक्रेता अब्दुल वाजिद अब्दुल करीम याला विचारणा केली आसता हिमायतनगर येथील गुटखा विक्रेता शेख आमीर शेख खमीर यांचा असल्याचे सूतोवाच केले त्यावरून बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गुटखा प्रतिबंधक कलम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आजच्या कार्यवाहीत 3 लाख 99 हाजार रुपयाचा गुटखा आणी 2 लाख रुपयांची ऑटो किंमत दोन्ही मिळून सहा लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत एव्हढी मोठी कारवाही प्रथमच झाल्याचे नागरिकात बोलल्या जात असून हिमायतनगर येथील गुटखा तस्कर आमीर भाई हेच विदर्भ मराठवाड्यातील सर्वात मोठे गुटखा तस्कर असल्याची माहिती पुढे येत असून गेल्या कित्येक वर्षापासून ते गुटखा तस्करीचे रॅकेट चालवत असल्याची माहिती पुढे येत आहे आणि वर्षानुवर्षापासून अवैध मार्गाने गुटखा तस्करी करून सुद्धा त्यांच्या वर प्रथमच कार्यवाही झाल्याचे सुद्धा नागरिक बोलत आहेत
बिटरगाव पोलीस स्टेशन सारख्या ग्रामीण भागात पोलीस विभागाकडून जर लाखो रुपयांचा गुटखा पकडून कार्यवाही केल्या जात असेल तर ज्या विभागाच्या अंग खांद्यावर प्रतिबंधित गुटखा तस्करी थांबवण्याची जबाबदारी आहे तो विभाग कधी जागा होऊन गुटखा तस्करी थांबवेल याबाबत सर्वसामान्यतून संभ्रम व्यक्त केल्या जात आहे
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक पवन कुमार बनसोड पोलीस उपाधिक्षक प्रदीप पाडावी यांच्या मार्गदर्शना खाली
ठाणेदार सुजाता बनसोड पोलीस उपनिरीक्षक शिवाजी टेंभुर्णे पोलीस जमादार मोहन चाटे पोलीस शिपाई निलेश भालेराव पोलीस शिपाई प्रवीण जाधव यांनी ही कार्यवाही पार पाडली असून गुटखा तस्करावरील या कार्यवाहीने अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणल्याचे दिसून येत आहे

प्रतिनिधि ताहीर मिर्ज़ा उमरखेड यवतमाळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *