(सचिन बिद्री:उमरगा)
महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र आयोजित करिअर कट्टा उपक्रमांतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास सेंटर ऑफ एक्सलन्स महाविद्यालय म्हणून प्रमाणपत्र आणि एक लाख रुपयांचा धनादेश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पुण्यात आयोजित कार्यक्रमात
भारत शिक्षण संस्था उमरगा संचलित श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचा राज्य सरकारच्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ महाविद्यालय म्हणून गौरव करताना उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, करिअर कट्टा उपक्रमाचे प्रमुख यशवंत शितोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील एकूण 25 महाविद्यालयाची निवड करण्यात आली आहे यामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचा समावेश आहे. राज्य सरकारच्या महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करिअर कट्टा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेल्या सर्व शाखांचे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले आहेत. तसेच क्लस्टर महाविद्यालय म्हणून उमरगा आणि लोहारा तालुक्यातील महाविद्यालय यांचाही समावेश या उपक्रमामध्ये करण्यात आला आहे.
याची उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान साह्यता केंद्राच्या वतीने दखल घेऊन ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ महाविद्यालय म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. महाविद्यालयाच्या शैक्षणिक उपक्रमात केलेल्या या उत्तुंग यशाबद्दल महाविद्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल शिवाजीराव मोरे यांच्या हस्ते महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि करिअर कट्ट्याचे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. संजय अस्वले, उपप्राचार्य प्रा. डॉ. विलास इंगळे, उपप्राचार्य प्रा. डॉ. पी ए पिटले, उपप्राचार्य प्रा. जी एस मोरे, पर्यवेक्षक प्रा.शैलेश महामुनी करिअर कट्ट्याचे महाविद्यालयीन समन्वयक प्रा. डॉ. एस पी पसरकले प्रा. डॉ. एके क कटके, आणि शिक्षकेतर कर्मचारी म्हणून तानाजी शिंदे तसेच करिअर कट्टा विद्यार्थी संसद मुख्यमंत्री आणि पदाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले.
भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आश्लेष भैय्या मोरे, सरचिटणीस जनार्दन साठे, चिटणीस पद्माकर सहचिटणीस डॉक्टर सुभाष वाघमोडे आणि संस्था पदाधिकारी महाविद्यालयाची प्राचार्य डॉ धनश्याम जाधव यांनी अभिनंदन आणि कौतुक केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ विनोद देवरकर आणि आभार डॉ अस्वले यांनी केले यावेळी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते