section and everything up until
* * @package Newsup */?> बार अँड रेस्टोरंटवर पोलिसांचा छापा:पाच महिलांची सुटका तर चौघाविरोधात गुन्हा नोंद | Ntv News Marathi




अनैतिक देह व्यापार करणा-यावर गुन्हा दाखल


उस्मानाबाद : स्वतःच्या फायद्यासाठी जकेकूर औद्योगिक वसाहत येथील बार अँड रेस्टोरंटच्या रूममध्ये 5 महिलांना वाणीज्यीक प्रयोजनाकरिता आश्रय देत ग्राहकांच्या मागणी प्रमाणे लैंगिक समागमास प्ररावृत्त करणाऱ्या वेश्या व्यावसायांस भाग पाडणाऱ्या चार इसमावीरुध्द दि 13 रोजी उमरगा पोलिसांच्या विशेष पथकाणे अचानक धाड टाकून कारवाई केली आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की,आरोपी नामे १)शिलरत्न माधव गायकवाड, वय २२ वर्षे, रा.गुंजोटी २) जयदिप सोनकवडे रा. उमरगा ३) राहुल मल्लीनाथ पुरातले वय २४ वर्षे, ४) अजय ज्ञानेश्वर कांबळे, वय २३ वर्षे, दोघे रा.भिमनगर उमरगा यांनी संगणमत करुन स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी दि.13 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास जकेकुर एम. आय. डी. सी. येथील रोहन
बार ॲन्ड रेस्टॅरंट येथील वरच्या मजल्यावरील रुममध्ये ५ महिलांना वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय देउन त्यांना ग्राहकांचे मागणी प्रमाणे लैंगीक समागमनाकरीता करीता पराववृत्त करुन त्यांना वैश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून त्यांच्यावरती उपजिवीका करीत असताना मिळून आले.यावरुन पोलीसांनी छापा कारवाई करुन यातील पिडीत महिलांची सुटका करुन सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम
३७०,३७०(अ)(२),सह अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम ३, ४, ५ अंतर्गत उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवन्यात आला आहे.


सचिन बिद्री : उमरगा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *