प्रतिनिधी (आयुब शेख )
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग मध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 13 जण पोलिसांच्या ताब्यात, 9,38,200 मुद्देमाल जप्त,
नळदुर्ग पो. ठा. हद्दीत सत्यम हॉटेलचे बाजूचे बंद खोलीमध्ये नळदुर्ग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांच्या आदेशाने
छापा टाकला. यावेळी आरोपी नामे -1)शिवराज शशिंकात भुमकर, वय 35 वर्षे, रा. नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव, 2) चेतन बजरंग धतेकर, वय 36 वर्षे रा. धाराशिव, 3) अजय दिलीप गायकवाड, वय 32 वर्षे,4) अतुल दिलीप ढोंगरे, वय 30 वर्षे, दोघे रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर जि. धाराशिव, 5) प्रसाद अर्जुन शिंदे, वय 23 रा. बोरगाव ता. औसा जि. लातुर, 6)सागर शंकर कलशेट्टी, वय 29 वर्षे, 7) अबुताहेर बडेसाब कुरेशी, वय 38 वर्षे, 8) इरफान हनिफ कुरेशी, वय 35 वर्षे, 9) मोहन शांताराम लोहार, वय 29 वर्षे, 10) आदम अख्तर जहागीरदार, वय 30, 11) अंकुश अंबादास काळे, वय 35 वर्षे, 12) इरफान हसन शेख, वय 35 वर्षे, सर्व रा नळदुर्ग, ता. तुळजापूर जि. धाराशिव, 13) जुगाराचा अड्डा चालविण्यास देणारा अनोळखी जागा मालक हे सर्वजन नळदुर्ग येथील सत्यम हॉटेलचे बाजूचे बंद खोलीमध्ये येथे तिरट जुगार खेळत व खेळवित असताना
जुगाराच्या साहित्यासह एकुण 17,200 ₹ रक्कम सह महिंद्रा कंपनीची फोर व्हिलर, हिरो होन्डा मोटरसायकल व 10 ॲन्ड्राईड व आयफोन मोबाईल असा एकुण 9,38,200 ₹ किंमतीचा माल स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 4,5 अन्वये नळदुर्ग पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे