सचिन बिद्री:उमरगा-धाराशिव
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा पोलिसांचा आपल्या हद्दीतील अवैध धंद्याची माहिती काढून कार्यवाही करन्याची मोहीम सुरुच असून दि.२३ सप्टेंबर रोजी जकेकुर शिवार येथील चौधरी कॉलनीतील बाळु तुकाराम शिंदे यांच्या घराच्या वरच्या मजल्यावरील एका खोलीत काही इसम तिरट नावाचे जुगार खेळत व खेळवित असताना रात्री अचानक पोलिसांनी धाड टाकून तब्बल 16 इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करीत जवळपास अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की,पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने व अप्पर पो.अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्हा हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढून कार्यवाही करन्याच्या अनुषंगाने उमरगा हद्दीतील जकेकुर शिवार येथे रात्रीस पेट्रोलियम करताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जकेकुर शिवार येथील चौधरी कॉलनी येथे बाळु तुकाराम शिंदे यांच्या घराच्या वरच्या मजल्यावरील एका खोलीत काही इसम तिरट नावाचे जुगार खेळत व खेळवित आहेत.सदर ठिकाणी जवळपास रात्री 11 वाजता छापा मारला असता सदर ठिकाणी मिळून आलेले इसम नामे १) विक्रम भानुदास माने,२) जितेंद्र ज्ञानोबा काळे,३) अमोल विठ्ठल जाधव,४) हितेन हरीलाल पटेल,५) अजित जिलानी उस्ताद, ६) काका देविदास गायकवाड,७)अमोल किसन माने, ८) बालाजी बाबुराव गायकवाड, ९) ऋषी किशोर जाधव, १०) तानाजी नागोराव गाडे, ११) राम किसन तोरंबे, १२) विलास रंगनाथ जाधव, १३) नागेश राम पवार, १४) राहुल धनु राठोड, १५) सचिन गायकवाड,१६)शरद मारेकर हे सर्व लोक तिरट जुगार खेळत असताना पथकास मिळुन आले. नमूद जुगार अड्ड्यावरुन तिरट जुगाराचे साहित्यासह १२ मोबाईल फोन,३ मोटरसायकल व रोख रक्कम असा एकुण २,२८,३५५₹ किं चा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला असुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- ४,५ अंतर्गत उमरगा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवन्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या आदेशावरुन उमरगा पोलीस ठाण्याचे पारेकर,सपोनि भराटे,पोलीस
नियंत्रण कक्षाचे सपोनि तिगोटे, पोलीस नियंत्रण कक्ष व उमरगा पोलीस ठाणेचे अंमलदार यांच्या पथकाने केली आहे.